हे आहेत मराठीतले सिक्सपॅक वाले डॅशिंग हीरोज…

0
364
views

मराठी चित्रपटात मध्ये marathi actors ना जास्ती महत्व नसते, महत्व हे चित्रपटाच्या कथेला असते. या मुळेच सैराट कोणाच्या ध्यानी मनी नसताना प्रचंड यशस्वी झाली. या उलट हिंदी किंवा तेलगू सेनमा मध्ये कथेच्या अगोदर कलाकार कोण आहे हे बघितले जाते. या मुळे तिकडचे कलाकार हे शरीरयष्टी इत्यादी बाबींवर खास भर देतात.

पण सध्या काळ बदलला आहे. मराठी मध्ये देखील सर्व प्रकारच्या सेनमा बनू लागले आहेत. सिनेमाचं नाही तर मराठी सिरीयल साठी देखील चांगले बळकट शारीरयष्टी ची मागणी वाढत आहे. आज मी अशाच काही बॉडीबिल्डर marathi actors ची यादी तुमच्या समोर घेऊन आलोय

1हार्दिक जोशी

हार्दिक हा अगोदर ‘रंगा पतंगा’ (2015) मधे पोलीस म्हणून दिसला होता. सध्या हार्दिक जोशी हा झी मराठी वरील मालिक तुझ्यात जीव रंगला मधे काम करतोय. यात तो राणा या पहिलवानाची भूमिका करतोय. हार्दिकच हे पात्र खुपच लोकप्रिय झाले आहे. हे पात्र लोकप्रिय होण्यामघे हार्दिक ची बलदंड शारीरयष्टि तितकीच् कारणीभूत आहे.

2चिन्मय उदगीरकर

चिन्मय उदगीरकर हा मराठी ऍक्टर स्टार प्रवाह च्या ‘स्वप्नांचा पालिकडले’ मध्ये दिसला होता. त्या नंतर तो 2015 मध्ये झी मराठी वरील नांदा सोख्य भरे मध्ये नील नावाच लीड रोल मध्ये काम केल. तो त्याचा आगामी चित्रपट वाझलच पाहिजे साठी सिक्स पॅक बनवले आहेत.

3उमेश कामत

उमेश कामत हा खूप लोकप्रिय असा अभिनेता आहे. तो आणि त्याची बायको प्रिया बापट हे cute cuples सोशल मीडिया वर खूप लोकप्रिय आहेत. साधारण उमेश ची छवी हि चॉकलेट हिरो म्हणून आहे. पण उमेश चे सोशल मीडिया वरील pics बघता तो, ती छवी बदलण्याच्या तयारीत दिसतोय.

4देवदत्त नागे

देवदत्त नागे हे प्रसिद्ध टीव्ही सिरीयल ‘जय मल्हार’ मधील खंडोबा होय. देवदत्त ने खंडोबा च्या रोल साठी बॉडी वर खूप मेहनत घेतली आहे. जय मल्हार हे सिरीयल या सिक्स पॅक वाल्या रुबाबदार खंडोबा मुळे फार गाजली आणि देवदत्त खंडोबा म्हणून खूपच प्रसिद्ध झाला. सध्या देवदत्त ची पर्सनॅलिटी ही हॉलिवूड हिरो पेक्षा कमी नाही.

5अनालेश देसाई

अनालेश देसाई हा देखील देवदत्त सारखाच रोल मुळे प्रसिद्ध झाला. तो कलर्स मराठी वरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या सिरीयल मध्ये महादेवाची भूमिका करतो. अनालेश ने देखील महादेवाचा रोल साठी बॉडी बनवली आहे. तो या मालिकेत लीड रोल मध्ये नसला तरी लोकांन कडून त्याला कामासाठी खूप दाद मिळाली.

6श्रेयश तळपदे

श्रेयश तळपदे ने आपल्या कलेच्या च्या जोरावर बॉलिवूड मध्ये आपले एक स्थान निर्माण केलं आहे. मराठी नाटक ते बॉलिवूड हिरो हा त्याचा प्रवास नकीच सोप्पा नव्हता. बॉलिवूड नंतर श्रेयश मराठी मध्ये ‘बाजी’ या चित्रपटा द्वारे परतला. बाजी साठी त्याने जबरदस्त सिक्स पॅक साकारले होते.

7जितेंद्र जोशी

जितेंद्र जोशी ने खूप शे मराठी, हिंदी सिनेमा केलेले आहेत. त्याचा नुकताच रिलीज झालेला आणि प्रियांका चोप्रा निर्मित ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमातील रोल साठी त्याच खूप कौतुक झाल आहे. जितेंद्र जोशी ने ‘बाजी’ मध्ये निगेटिव्ह रोल केलं आहे. त्या साठी त्याने बॉडी बनवली होती.

8संतोष जुयेकर

सध्या संतोष हा no 1 मराठी मालिका ‘असं सासर सुरेख बाई’ या प्राईम टाइम मालिकेत काम करतोय. तो त्यात यश महाजन म्हणून लीड रोल करतोय. संतोष हा ‘झेंडा’, ‘मोरया’ सारखा सिनेमात  लीड रोल मध्ये होता. तो त्याचा आगामी सिनेमा साठी सिक्स पॅक बॉडी बनवतोय.

9गश्मीर महाजनी

‘कॅरीऑन मराठा’ या सिनेमा मधला डॅशिंग हिरो म्हणजे गश्मीर होय. गश्मीर हा तेलगू सिनेमा मधल्या डॅशिंग हिरो सारखा दिसतो, आणि त्याचा कॅरीऑन मराठा हा सिनेमा पण तेलगू सारखंच होत. गश्मीर चा आगामी सिनेमा कान्हा येतोय त्यात पण तो डॅशिंग रोल मध्ये आहे असे दिसतय.

थोडक्यात काय तर मराठी सिनेमा पण कात टाकत आहे. आपल्या भविष्यात या कलाकारांची मराठी ऍक्शन मुव्ही बघायला मिळतील.

मराठा मोळ्या कलाकारा बद्दल चा हा  लेख आवडला का? तुमचं मत कळवा कॉमेंट करून. atozmarathi चे फेसबुक पेज लाईक करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या धन्यवाद..

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा