असे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती

0
731
views

शिवस्मारक(Shiv Smarak)

अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकच्या  (shiv smarak) भूमिपूजनासाठी येत्या २४ डिसेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडेल. हा कार्यक्रम आणि हे स्मारक दोन्हीही वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत…

भूमिपुजना बद्दलची काही वैशिट्ये

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी भूमिपूजनासाठी वापरले जाणार आहे. शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गडकिल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, नाशिक, आग्रा, तंजावर आणि श्री शैल्यमवरून माती आणण्यात येणार आहे.

शिवस्मारक साकारण्यासाठी खर्च- ३६०० कोटी रुपये.

स्मारक सारकरण्यासाठी जवळपास 3600 कोटी एवढा खर्च येणार आहे. हे स्मारक गिरगाव चौपाटी पासून 3.6 किलोमीटर वर समुद्रात उभारण्यात येणार आहे. पाण्यातील खडकावर 15.86 हेक्टरवर स्मारक उभारणार येणार आहे. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि हा जगातला सर्वात उंच स्मारक असेल.

शिल्पकार राम सुतार यांनी हा महाराजांचा अश्वारूढ पुतळा साकारला आहे. या पुतळ्याची उंची 126 मीटर एवढी असणार आहे. हा आकडा बिना चौथऱ्या चा आहे, चौथऱ्या ला पकडून हा 210 मीटर एवढा भव्य दिव्य होईल. हा गुजरात मध्ये उभारला जण्याऱ्या सरदार वल्लभ पटेल यांच्या पुतळ्याचा दुप्पट आहे.

या अश्या भव्य दिव्य स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम १९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्याचे कामाची चाचणी करून पुढे काम सुरु होईल. हे काम फ्रान्सच्या ईजीआयएस या कंपनी ला देण्यात आला असून त्या कंपनीने स्मारकाचा आराखडा तयार केला आहे.

काय काय असेल मधे

१)महाराजांची माहिती आणि देखावे

पर्यटकांनी या स्मारका च्या परिसरात प्रवेश केला तेंव्हा त्यांना तुळजाभवानी मातेचे दर्शन मिळणार आहे. या साठी तुळजापूर च्या मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे. या क्षेत्रा पुढे जलदुर्गासारखी दगडाची तटबंदी साकारली जाणार आहे.

स्मारका मध्ये महाराजांचा जीवनपट उलगडणारा अर्ध्या तासाचा लघुपट दाखवला जाणार आहे. स्मारका मध्ये दररोज दोन वेळा दोनशे कलाकारांच्या माध्यमातून राजेंच्या राज्याभिषेकाचा प्रसंग साकारण्यात येणार आहे. सोबत थ्री डी आणि फोर डीच्या लाईट व साऊंड यांचे शो बघायला मिळणार आहे.

स्मारकात महाराजांच्या विषयीचे ग्रंथ संग्रहालय, कला संग्रहालय हे उभारण्यात येणार आहेत. मत्स्यालय, ऑडीटोरीअम, विस्तीर्ण बाग बगिचे, आयमॅक्स सिनेमागृह यांचे निर्माण केले जाणार आहे. या भव्य आणि दिव्य पुतळ्याचे मनमोहक रूप हे अॅम्पिथिएटर मध्ये बसून अनुभवता येणार आहे.

२)सुरक्षा आणि सुविधा

सुरक्षेसाठी पर्यटकांना एक सिक्युरिटी बँड परिधान करणे बंधन कारक असणार आहे. या बँड च्या मदतीने पोलीस पर्यटकांच्या हालचालींन वर लक्ष ठेवणार आहेत. जर काही संधिग्ध बाब आढळले तर त्यावर त्वरित कारवाई होणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी दोन जेट्टींसह हेलीपॅडही उभारले जाणार आहे. याशीवाय पर्यटकांसाठी उपहारगृह, वैद्यकीय सेवेची व्यवस्था केली जाणार आहे. चौथऱ्यामध्ये वेगवेगळ्या मजल्यावरून दृश्यावलोकनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

जगातल्या या सर्वात भव्य दिव्य स्मारक बद्दल तुमचं काय मत आहे. कॉमेंट करून कालवा आणि आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Interesting
Loading...

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा