मकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

2
7313
views

मकर संक्रांती

​भारत हे त्योहारांचा देश आहे. इकडे प्रत्येक महिन्यात कुठलं ना कुठलं सण हे असतेच. यातच नव्या कॅलेंडर वर्षात पहिला आणि महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीच्या. हा सण सगळे रुसवे फुगवे विसरून जाऊन, गुण्या गोविदाने राहायची शिकवण देणारा आहे. इतर सणा प्रमाणे मकर संक्रांती ला देखील एक वेगळे महत्व आहे आणि याला वैज्ञानिक आधार देखील आहे.आज आपण याचे महत्व आणि वैज्ञानिक आधार दोन्ही वर प्रकाश टाकणार आहोत.

आपल्या मधील खूप कमी लोकांना मकर संक्रांती बदल खूप कमी माहिती आहे. जसे संक्रांती का साजरी केली जाते? आणि ही जानेवारी च्या 14 तारखेलाच का? याच नाव मकर संक्रांतीच का आहे? इत्यादी बाबी सहसा कोणाला माहिती नाहीयेत तर अश्या प्रश्नांना उत्तरे देत च आजचा लेख लिहला गेला आहे.

1. कसे पडले नाव?

मकर संक्रांती

मकर एक रास आहे आणि सूर्य एका राशि मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांती दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे या सणा ला मकर संक्रांती असे म्हणटले जाते.

याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. इत्यादी.

2. दर वर्षी एका तारकेलाच कसे काय येत हे.

कदाचित हा हिंदु संस्कृती मधील एकमेव असा सण असेल जो एकाच तारखेला येतो. याच कारण हा सण सोलर (सूर्या च्या स्थान वर) कॅलेंडर फॉलो करतो. बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडर (चंद्रमा च्या स्थना वर) आधारलेले असतात.सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 तारखेला साजरा केला जातो.

मागच्या वर्षी म्हणजे 2016 ला मकर संक्रांती ही 15 तारखेला साजरी करण्यात आली होती. हा सण दर 50 वर्षी नी एक तारीख पुढे जाते. जसे स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी ला झाला तेव्हा मकर संक्रांतीच होती. या हिशोबाने 2050 ला हा सण 15 जानेवारीला साजरा होईल.

3.तीळ आणि गूळ यांचं महत्व.

मकर संक्रांती

मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू बनवायची परंपरा आहे. या माघे, भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा अशी मान्यता आहे. जर याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास गूळ शरीराला थंडीमध्ये उष्णता देईल आणि तीळा मुळे शरीरात आवश्यक प्रमाणात स्नीग्धता राहील असे आहे.

4. नाव अनेक पण सण मात्र एकच

संक्रांति ही काय फक्त भारतातच साजरी नाही होत. ही आशिया खंडातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. पण हा सण मात्र एकच आहे.

5.पतंगा चे महत्व

tyभारतात गुजरात आणि राजेस्थान या ठिकाणी हा सण पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर राहायला मदत मिळते.

6. दिवस आणि रात्र एक समान

या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होऊन गर्मी चे दिवस यायला लागतात.

अश्या या नाविन्य पूर्ण आणि वैशिष्ट्य पूर्ण मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.. तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला…. आणि शेवटी लेख आवडला असेल तर कॉमेंट करा धन्यवाद.

आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करायला विसरू नका.

2 COMMENTS

  1. छान माहिती आहे…..
    अशीच माहिती पुरवत जा..
    आजच्या लिखाणात सासत्य ही छान वाटल.
    अभिनंदन….

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.