वेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार

0
11295
views

वेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार

जर समजा तुमचा बँकेत असा अकाउंट आहे. ज्यात रोज सकाळी एक ठराविक रक्कम जमा होते – आपोआप. समजा 86,400 रुपये. पण हे पैसे तुम्हाला त्याच दिवशी वापरावे लागतात. कारण संध्याकाळी तुमचा अकाउंट परत झीरो होऊन जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत 86,400 रुपये तुमच्या खात्यात जमा होतात – आपोआप. यातले तुम्ही पूर्ण पैसे वापरून घ्या किंवा अर्धे वापरा किंवा नका वापरू, संध्याकाळी तुमचा बॅलन्स परत झीरो.

पुढच्या दिवशी सकळी पुन्हा हजार रुपये – आपोआप आणि न चुकता. असा अकाउंट कोणाचा असला तर तो काय करेल? बहुतांश लोक काय करतील?

बहुतांश लोक यासाठी प्रयत्न करतील की पूर्ण नाही तरी जास्तीत जास्त पैसे आपल्याला वापरता यावेत, कारण उरलेली रक्कम दुसऱ्या दिवशी कामाला येत नाही.

मुळात असा अकाउंट प्रत्येकाचा असतो. पण पैशांचा नाही, वेळेचा.

रोज सकाळी आपल्या खात्यात 24 तास म्हणजेच 86,400 सेकंद जमा होतात. आपण त्यातले किती का वापरत नाही, दिवसाच्या अखेरीस आपोआप अकाउंट बॅलन्स झीरो होऊन जातो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत 86,400 सेकंद खात्यात जमा होतात.

वेळ धावत आहे. वेळेचा पुरेपूर वापर करा.

वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार

१.घड्याळ सतत धावत आहे.

२.मिनिटांची काळजी घ्या, तास स्वतःची काळजी घेतील.

३.गेलेली वेळ पुन्हा येत नाही.

४.वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा.

५.वेळ वाया, आयुष्य वाया.

६.कुठलंही काम करताना पूर्ण वेळ फक्त तेच काम करा.

७.जीवन फारच लहान आहे. जेवढा कमी अपव्यय करता येईल तेवढा कमी करा.

८.वेळ तशीही निघूनच जाणार आहे. प्रश्न आहे तुम्ही त्याचा कसा वापर करणार.

९.वेळेला सहज पणे कधीही घेऊ नका. जगातील सर्व पैसे देऊन गेलेला एक क्षण परत मिळवला जाऊ शकत नाही.

१०.यशस्वी लोकांना वेळेच्या मूल्याची तीक्ष्ण जाण असते.

कसे वाटले हे सुविचार आवडले असतील तर आमच्या मराठी मोटिव्हेशन पेज ला लाइक करा.

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.