व्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने ?

सोशल मीडियावर एक व्हिडियो सध्या व्हायरल होतोयं. मुलगा आणि पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडियो सर्वांच्या पसंतीस पडत आहे.

0
362
views

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडियो सध्या व्हायरल होतोयं. मुलगा आणि पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडियो सर्वांच्या पसंतीस पडत आहे.

यामध्ये शाळेत जाणारा विद्यार्थी पोलीस अधिकाऱ्याच्या रस्त्यात येतो.

उभा राहून सॅल्यूट करतो. हा व्हिडियो बंगळुरूचा आहे.

ज्यांना सॅल्यूट केलय ते बंगळुरू पोलीस कमिशनर टी. सुनील कुमार आहेत.

पोलिसांनी केला शेयर

बंगळुरू शहर पोलिसांनी हा व्हिडियो आपल्या फेसबुकपेजवर शेयर केलायं. १५०० हून अधिकजणांनी हा व्हिडियो शेयर केला असून ८० हजारहून अधिक जणांनी पाहिलायं.

टी. सुनिल कुमार यांनी गेल्यावर्षीऑगस्ट महिन्यात पोलीस चार्ज घेतला. प्रवीण सूद यांच्या बदलीनंतर ते आले.

अधिकाऱ्यानेही ठोकला सॅल्यूट

पोलीस कमिशनर हॉस्पीटलच्या बाहेर येत आहे. तिथून एक विद्यार्थी जातोय. पोलिसांना पाहताच तो विद्यार्थी थांबतो आणि सॅल्यूट ठोकतो.

त्या विद्यार्थ्याकडे लक्ष जाताच पोलीसही त्याला सॅल्यूट ठोकतात. काही तासातच हा व्हिडियो खूप व्हायरल झालायं.

Interesting
Loading...

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा