2016 मध्ये या पाच महिला खेळाडूनी रचला इतिहास

0
2336
views

​वर्ष २०१६ (2016 sports) मध्ये भारतीय नारी शक्ती ने इतिहासच रचला. ऑलम्पिक मध्ये फक्त महिला खेळाडूंना दोन पदक मिळाली. भारतातील अनेक दिग्गज खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना निराश केले. तर काही नवोदित खेळाडुंनी जसे पीव्ही सिंधू , साक्षी मलिक यांनी अनपेक्षितपणे चमकदार कामगिरी करून क्रीडाप्रेमींची मने जिंकली. चला तर जाणून घेऊयात विविध क्रीडा प्रकारातील या 5 महिलांची वर्ष 2016 मधली कामगिरी.

5सानिया मिर्झा

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने यंदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिस जोडीने झेक गणराज्याच्या अँड्रिया लाव्हाकोव्हा आणि ल्यूसी हरडेकाचा अंतिम फेरीत पराभव केला.

महिला दुहेरीत सानिया मिर्झाने करिअरमधील तिसरे ग्रँड स्लॅम पटकावले. सानिया मिर्झाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टाइम मॅगझिनने तिचा या कामगीरी वद्दल तिला २०१६ मधील जगातील १०० प्रभावशाली लोकांच्या यादीत सामील केले होते.

4दीपा कर्माकर

भारतात जिम्नॅस्टिक हा खेळ अजिबात खेळले जात नाही. त्याला लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन पण सकारात्मक नाहीये. या परिस्थितीत देखील दीपा कर्माकर या त्रिपुरा मधील 23 वर्षीय मुलीने इतिहास रचला. ती या खेळामध्ये ऑलम्पिक साठी पात्र ठरलेली भारताची पहिली खेळाडू ठरली. तिने सुमारे १५.०६६ गुण मिळवले. कांस्य पदक पटकावलेली स्वित्झर्लंडची गुईलिया स्टेनग्रुबर पेक्षा (१५.२१६) ती फक्त ०.१५ गुणांनी मागे होती.

प्रोडोनोव्हा सारख्या अवघड प्रकारात तिने ही कामगिरी केली. या प्रकारात भाग घेण्याचे अमेरिका आणि रशियाचे क्रीडापटूही टाळतात. आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात यश मिळूनही खेळाडुंना जितकी लोकप्रियता मिळत नाही. त्यापेक्षा अधिक पदकतालिकेत चौथ्या स्थानी राहून दीपाने लोकप्रियता मिळवली आहे.

3दीपा मलिक

पॅरालिम्पिक म्हणजे अपंग व्यक्तींची ऑलम्पिक होय. यात भारताकडून दीपा मलिक या पॅरालिम्पियन ने यंदा रिओ पॅरालिम्पकमध्ये भारताची मान अभिमानाने उंचावली. दीपाने गोळाफेक एफ-५३ प्रकारात रौप्य पदक पटकावले. अश्या खेळ प्रकारात भारताकडून पदक मिळवणारी दीपा हि प्रथम भारतीय अथलीट बनली. दीपा मलिकचा कंबरेपासूनचा भाग हा लकवाग्रस्त आहे. ट्यूमरमुळे तिच्यावर ३१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

2साक्षी मलिक

रियो ऑलम्पिक मध्ये मोठंमोठ्या खेळाडूंनी पादकांच्या बाबतीत निराश केलं. मागच्या ऑलम्पिक मध्ये कुस्ती ने दोन पदक मिळवून दिले होते. म्हणून या वेळी देखील नरसिंह यादव आणि योगेश्वर दत्त सारख्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले हरियाणाच्या साक्षी मलिकने. साक्षीने ५८ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.

साक्षीसाठी हे पदक मिळवणे सोपे नव्हते. साक्षीला रेपचेजच्या पहिल्या फेरीत किर्गिस्तानची पैलवान एसुलू तिनिकोव्हाकडून ०-५ ने पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या फेरीत प्रारंभी पिछाडीस राहिल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत तिने ही लढत ८-५ अशी जिंकून इतिहास रचला. साक्षीला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

1पी.व्ही. सिंधू

वर्ष २०१६ मध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधू नावाचे रत्न मिळाले. सिंधूने यंदा रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवून इतिहास रचला आहे. महिला बॅडमिंटन एकेरीच्या अंतिम फेरीत सिंधूला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनने २१-१९, १२-२१, १५-२१ ने पराभूत केले.

सिंधूला सुवर्ण पदक मिळाले नसले तरी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. यावर्षी तिने चायना ओपनचा किताबही जिंकला. सायना नेहवालनंतर चायना ओपनचे जेतेपद पटकावणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली. तिला यंदाचा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.