आता होणार आधार कार्ड ने पेमेंट? बघा हे कस शक्य आहे.

0
401
views

आधार कार्ड पेमेंट सिस्टम

काळ्या पैशांवर लगाम लावण्या साठी सरकारने नोट बंदिचा निर्णय घेतला. त्या नंतर आता सरकार देशाचा कैशलेस इकॉनोमीला चलना मिळावी म्हणून एक महत्वाचे पउल टाकण्याचा विचारात आहे. देशातील नागरिकांना त्यांचा 12 अंकी आधार न. च्या सह्याने पेमेंट करता येईल अशी व्यवस्था केली जात आहे. या मुळे पुढे चालून क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चा वापर संपुष्टात येऊ शकतो.

या साठीची सर्व धोरणे निती आयोगाकडून आखली जात आहेत.युनिक आयडेंटिटी अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक अजय पांडे या संदर्भात म्हणाले, सर्व पेमेंट आधार कार्डशी जोडण्याची ही योजना असून ही ट्रान्झॅक्शन्स कार्ड रहीत व पिन रहित असतील.

अँड्राईड मोबाईल फोन युजर्स आधार नंबर व फिंगरप्रिट च्या सहाय्याने ही डिजिटल देवघेव करू शकतील. त्यात मोबाईल उत्पादक कंपन्या, व्यापारी व बँका सामील होतील. या साठी सरकार कडून मोबाईल ऍप पण काढण्यात येऊ शकते.

aadhaar-card-prototype

निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले भारतात जे मोबाईल उत्पादक आहेत त्यांना देशात उत्पादन केल्या जाणार्‍या मोबाईलमध्ये इरिस आयडेंटिटी( बुबळाचे प्रतिमा) अथवा फिंगरप्रिट ओळख सिस्टीम देण्याविषयी सांगितले गेले आहे. आधार कार्ड पेमेंट अधिक प्रमाणात वापरले जावे यासाठी अशा प्रकारच्या देवघेवींवर इन्सेन्टिव्ह देण्याचाही विचार केला जात आहे.

फायदे आधार कार्ड पेमेंट चे फायदे:

  • हा पिन आणि ट्रांझेक्शन कार्ड रहित.
  •  पिन शिवाय बोटांच्या ठशाचा वापर किंवा डोळ्यांचा बुबळांचा वापर परिणामी हे अधिक सुरक्षित असेल
  • वापरण्या साठी एकदम सोप्पे
  • आधार कार्ड डेबिट आणि क्रेडिट कार्ड तुलनेत खूप च जास्ती आहेत. म्हणून सर्वाना हे पेमेंट करता येईल.

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.