राजेंद्र प्रसाद-देशाचे पहिले राष्ट्रपती

राजेंद्र प्रसाद

आज म्हणजे ३ डिसेंबर हा देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद प्रसाद यांचा जन्मदिवस होय, त्या निमित्याने त्यांच्या जीवनावर घेतलेला एक लहान आढावा.

३ डिसेंबर १८८४ मध्ये बिहार राज्यातील जीरादेइ या लहनशा खेड्यात राजेंद्र प्रसाद यांचा जन्म झाला. मॅट्रीकच्या परीक्षेत सर्वप्रथम क्रमांक मिळवणार्‍या राजेंद्रबाबूंनी कलकत्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून प्रथम क्रमांकानेच बी.ए, व एम.ए. च्या पदव्या मिळविल्या. त्यांनी कायद्याची सर्वोच्च पदवीही प्रथम क्रमांकानेच मिळवली होती.

विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकीय जागृती करणारी 'बिहार छात्र परिषद' ही संघटना स्थापन केली. सन १९११ पासून त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. आणि त्याच वर्षी ते काँग्रेसचे सदस्य बनले. स्वदेशी व लोकसेवा ही दोन व्रते राजेंद्रबाबूनी स्वीकारली होती. असामान्य बुद्धिमत्ता व नम्रता ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. १९६१ पासून त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. याच काळात चंपारण्यातील सत्याग्रहात ते गींधीजीसमवेत सामील झाले होते. १९१८ मध्ये खेडा जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या साराबंदी चळवळीतही ते सामील झाले होते.

जालियनवाला बागेतील हत्याकांडाच्या बातमीनंतर वकिली सोडून राजेंद्र बाबूंनी देश कार्यालाच वाहून घेतले. बिहार प्रांतात खादी, ग्रामोदयोग, अस्पृश्ता निवारण, राष्ट्रभाषा प्रचार, राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार इत्यादि अनेक कार्यात ते सहभागी झाले. १९२१ मध्ये त्यांनी "बिहार विदयापीठा'ची स्थापना केली याच काळात त्यांनी सदाकत आश्रम स्थापन केला.

१९३५ मध्ये मुंबईच्या कॉग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १९३९ मध्ये ते कॉग्रेसचे अध्यक्ष बनले.पुढे सन १९४६ च्या हंगामी सरकारात राजेंद्रप्रसाद अन्न व शेतकी खात्याचे मंत्री बनले 'अधिक धान्य पिकवा' ही मोहिम त्यांनीच देशभर पोहोचवली. १९४६ ते १९४९ या काळात ते घटना समितीच्या अंध्यक्षपदासाठी निवडले गेले.

२६ जानेवारी १९५० पासून १ मे १९६२ पर्यंत ते भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना "भारतरत्न" हा सर्वोचा बहुमान देण्यात आला होता. २८ फेब्रु १९६३ मध्ये त्यांचा देहान्त झाला.

डॉ.राजेंद्र प्रसाद उत्तम लेखकही होते. 'सर्चलाईट,' देश' नावाची वृत्तपत्र काढून लोकजागृतीचे कार्य त्यांनी केले. हिंदी भाषेत त्यांनी ' आत्मकथा ' ' चंपारण मे महात्मा गांधी' ' रवादी का अर्थशास्त्र ' 'बापू के कदमों में' इत्यादि ग्रंथ लिहिले.



टीप:-वरील लेख www.globalmarathi.com या वेबसाइट  वरून जशास तसा टाकयणात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या