रजनीकांत यांच प्रेरक जीवन चरित्र(marathi biography)

परिचय

शीवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, चित्रपटातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे.

रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत.


पूर्वजीवन / पार्श्वभूमी


रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा (मराठी भाषक) कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे.गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी ते सर्वात लहान आहेत.

त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी आहे असे सांगीतले जाते.तसेच जेजूरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयांत ते नाटकात भाग घेत. येथेच शिवाजीराव मधला एक कलाकार जन्माला आला.


बस कंडक्टर ते सुपरस्टार


१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी कुली आणि कारपेंटर सारखी वेगवेगळी कामं केली. नंतर त्यांना बंगळूर बस ट्रांस्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून काम मिळाले. पण अभिनयाची आवड त्यांनी जोपासली होती.

असाच एका दिवशी त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट ची जाहिरात बघितली, मग काय त्यांच्यातला अभिनेता गप्प बसेना. ते घराचांचा विरोध असतांना, राज बहादूर या मित्राच्या मदतीनेे चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले.

मद्रास फिल्म इंस्टीट्यूट मध्ये एका नाटकांत त्यांना के.बालचंद्र या तमिळ डिरेक्टर ने बघितलं, आणि त्यांना तमिळ शिकण्याचा सल्ला पण दिला. शेवटी के बालचंद्र यांनीच रजनीकांत यांना त्यांचा तामिळ ड्रामा फिल्म अपुर्वा रांगनगाल मध्ये एक लहानसा रोल दिला. हाच रजनीकांत यांचा डेबू फिल्म होय.

अपूर्वा रांगनगाल

सुरुवातीला रजनीकांत याना लहानसहान ते पण निगेटिव्ह रोल्सच मिळाल असत. त्यांनी 4 वर्षात 4 वेगळ्या भाषांमध्ये 50 सिनेमे केले ते पण तरी त्यांना फारसे यश कुठे मिळाले नाही. 1980 मध्ये डॉन या हिंदी सिनेमा च्या तमिळ रिमेक बिल्ला साठी रजनीकांत याना लीड रोल ऑफर मिळाली. या सिनेमाने त्यांना चांगलं नाव मिळवून दिल.


बिल्ला
इथून त्यांचे सिनेमे एका पाठोपाठ एक हिट झाले, आणि ते तमिळ सुपरस्टार झाले. त्यांचा बॉलिवूड मध्ये अंधा कानून हा पहिला सिनेमा होय. हळूहळू ते बॉलिवूड मध्ये पण त्यांची पकड मजबूत करत गेले.

व्यक्तिगत जीवन / लग्न


रजनीकांत यांचा पत्नीचे नाव लता रंगचारी असे आहे. ज्या एथिराज कॉलेज च्या विद्यार्थिनी होत्या, त्यानी कॉलेज मॅगझीन साठी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. 26 फेब्रुवारी 1981 मध्ये तिरुपती येथे त्यांचं लग्न झालं.

रजनीकांत आपल्या कुटुंबा सोबत

आज त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत. यात ऐश्वर्या यांचं लग्न धनुष या तमिळ सुपरस्टार सोबत झाले आहे. लता हे  'द आश्रम' नावाची शाळा चालवतात.

रजनीकांत यांची लोकप्रियता


दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही.

ते भारतातील व आशिया खंडातील ('शिवाजी द बॉस' या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. 'शिवाजी द बॉस' चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.

रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत.


गौरव, पुरस्कार आणि सन्मान


  • २००० सालचा भारत सरकारतर्फे दिल्या जाणार्या पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.

  • जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान/पुरस्कार द फ्युरिअर ने सन्मानीत.

  • जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतीक चित्रपटातील योगदानाबद्दल.

  • टाईम्स मॅगझीन ने रजनीकांत ह्यांना जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे

  • ६ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.

  • ९ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.

  • १० वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच लेखक, निर्माता,सहकलाकार, अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार.

  • महाराष्ट्र शासनाचा २००७ चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार) विजेता.

  • भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा चेवलिर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता.

  • २०१६ पद्मविभूषण पुरस्कार
रजनीकांत यांच जीवन चरित्र आपल्याला खूप काही शिकवून जात. ते अगदी कुली च काम करत आज सुपर स्टारच्या थाटात राहतात. त्यांनी आपल्या ध्येयाला चिकटून राहत जे हवे आहे ते मिळवायची धमक दाखवली. हे एवढं सगळं करायला त्यांना किती परिश्रम करावं लागले असतील हे आपण विचार करू शकतो.

रजनीकांत तुमच्या माझा सारखे सामान्य दिसतात. या मुळे एक चांगला अभिनेता असून बरेच वर्षे त्यांचा दुर्लक्ष केलं गेलं. पण रजनीकांत यांनी आपल्या कलेच्या जोरावर सर्वांना त्याचा कडे लक्ष द्यायला भाग पडलं.

रजनीकांत यांनी आजपर्यंत असे काही गोष्टी केलेलं आहेत जे दुसरं कोणी केलं नाही म्हणून तर त्यांचा वर खूप विनोद होतात ज्यात ते काहीही असंभव करू शकतात. असा हे प्रेरणा दाई व्यक्तिमत आज पण सगळ्यांच्या मना वर राज करतात.

Note: हा लेख विकिपीडिया आणि तत्सम वेबसाईट वरून माहिती घेऊन लिहला गेला आहे. तरी तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कंमेन्ट करून नक्की कळवा आणि या वेबसाईट ला सपोर्ट म्हणून शेर आणि लाईक करा धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या