June 8, 2023

रिकी पाँटिंग उर्फ रिकी थॉमस पाँटिंग याच जन्म १९ डिसेंबर, १९७४ मध्ये लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया येथे झाला. पाँटिंग हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे.

टास्मानिया या लहान शहरातून आणलेल्या आणि मिडल क्लास कुटुंबातला पॉंटिंग ने क्रिकेट वर अक्षरशः राज्य केलं. अश्या रिकी पाँटिंग चा आज बर्थडे होय. म्हणून त्याचा बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस खास तुमच्या साठी.

रिकी पाँटिंग इंटरेस्टिंग फॅक्टस

1.रिकी पाँटिंग चे nick name ‘पंटर’ असे आहे.

2. रिकी हा तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा होय. तो त्याचा लहान भाऊ drew सोबत अंगणात क्रिकेट खेळत असे. तो तासन तास आऊट होत नसे आणि drew ला चान्स मिळाला खेळायचा तर त्याला लवकर बाद करून परत तो बॅटिंग साठी सज्ज असे.

3. पॉंटिंग हा एक समृद्ध अश्या खेळाडू कुटुंबातून येतो. त्याचा भाऊ ग्राहम एक चांगला क्लब क्रिकेटर होता आणि तो उत्तम फुटबॉल खेळाडू देखील होता. त्याचे वडील थॉमस हे एक चांगले गोल्फ खेळाडू होते.

4.रिकी पाँटिंग याची आई lorraine हि टास्मानिया कडून vigoro हा खेळ खेळायची. हा खेळ क्रिकेट आणि टेनिस या खेळाचा मिश्रण आहे. रिकी चे काका greg cambell हे ऑस्ट्रेलिया साठी टेस्ट खेळले आहेत.

5.रिकी पाँटिंग हा ऑस्ट्रेलियन क्रीकेट विश्वातल आता पर्यंत चा सर्वात जास्ती रन आणि सेंच्युरी करणारा खेळाडू होय.

6.तो सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन देखील आहे आणि कॅप्टन असताना ऑस्ट्रेलिया ने तब्बल 3 वर्ल्ड कप जिंकले आहेत.

7.रिकी पाँटिंग ने त्याचा पहिला इंटरनाशनल शतक हे इंग्लंड विरुध्द लॉर्डस वर 1997 मध्ये बनवले, यात 127 रन बनवून तो आऊट झाला.

8.तो मार्च 2006 मध्ये 3 वेळेस टेस्ट पारी मध्ये लगातार शतक बनवले. असा करणारा तो जगातला तिसरा तर ऑस्ट्रेलियातील दुसरा खेळाडू होय. अस्ट्रेलियातून त्याचा अगोदर सर डॉन ब्रॅडमन यांनी ही किमया केली आहे.

9.पॉंटिंग हा टेस्ट क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर नंतर सर्वात जास्ती रन बनवलेला खेळाडू होय.

10. पोंटिंग ने झिम्बावे विरुध्द वर्ल्ड कप मधील मॅच मध्ये रन आऊट झाला, नंतर त्याने रागाच्या भरात ड्रेसिंग रूम मध्ये असलेल्या टीव्ही ची तोड फोड केली. या कृत्या साठी त्याला खूप मोठं दंड बसवण्यात आले होते.

11.पार्थ मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्धचा टेस्ट खेळून त्याने स्टिव्ह व्हॉ च्या 168 टेस्ट मॅच खेळण्याचं रिकॉर्ड ची बरोबरी केली.

हे फॅक्टस आवडले का ?? आवडले असतील तर कंमेन्ट करा तुमचं मत आणि प्रतिक्रिया [email protected] वर मेल करा. Atozmarathi च्या फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *