रितेश देशमुख-marathi biography


रितेश देशमुख हे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता आहे. तसेच तो भारतीय वास्तुकार (architect) आणि निर्माता देखिल आहे. रितेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांचे सुपुत्र आहे.



नाव:रितेश देशमुख
जन्म:17 डिसेंबर 1978
वडील:विलास राव देशमुख
आई: वैशाली देशमुख
भाऊ: अमित देशमुख(मोठा भाऊ), धीरज(लहान भाऊ).
पत्नी:जेनेलिया देशमुख

व्यक्तिगत जीवन

रितेश देशमुख याचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी झाला. तो माजी अवजड मंत्री आणि महाराष्ट्राचे मुखमंत्री, कैलासवासी विलासराव देशमुख यांचे सुपुत्र होय. रितेश च्या आईच नाव वैशाली देशमुख आहे. त्याला दोन भाऊ आहेत अमित देशमुख(मोठा भाऊ) आणि धीरज देशमुख (लहान भाऊ) हे दोघे पण सध्या सक्रीय राजकारणात आहेत.

रतेश देशमुख कुटुंबा सोबत दुर्मिळ फोटो


शिक्षण

त्याचं शालेय शिक्षण जी.डी.सोमाणी मेमोरियल स्कूल मध्ये झालं. ते पुढे कमला रहेजा रहेजा विद्या निधी इथून आर्किटेक्त म्हणून पदवी संपादन केली. त्या नंतर ते परदेशात जाऊन डिजाईनिंग च प्रशिक्षण घेतले. सध्या रिटेशची भारतात Evolution नावाची architectural आणि interior designing कंपनी आहे.

लग्न


3 फेब्रुवारी 2012 मध्ये रितेश आणि जेनेलिया डिसुझा यांचं लग्न झालं. ते आठ वर्षां पासून एकमेकांना डेट करत होते. रितेश आणि जेनेलिया त्याचा दोघांचं प्रथम चित्रपट 'तुझे मेरी कसम' आणि 'तेरे नाल लव हो गया' या दोन चित्रपटात काम केलं आहे. सध्या रितेश जेनेलिया यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा जो 24 नोव्हेबेर 2012 ला जन्मला त्याच नाव रिआन(Riaan) असे ठेवले. आणि लहान जो 1 जून 2016 ला जन्मला त्यांचं नाव राह्यल (rahyl) असे ठवले.



करियर

२००३ सालच्या चित्रपट तुझे मेरी कसमद्वारे रितेशने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर रितेश आउट ऑफ कंट्रोल मध्ये दिसला जो ठीक चालला. पण २००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'मस्ति'या चित्रपटामध्ये रितेश च्या कामाला दाद मिळली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर तुफान चालला. याचा फायदा रितेश ला झाला. त्यानंतर त्याला क्या कूल है हम रिलीज झाला.

तुझे मेरी कसम मधे रितेश जेनेलिया

क्या कूल हे हम हा चित्रपट सामान्य चालला असला तरी या मुळे रितेश ची ओळख चांगला कॉमेडियन म्हणून झाली. त्या नंतर ब्लफमास्टर, मालामाल विकली, हेय बेबी, धमाल, दे ताली,हाउसफुल,डबल धमाल,तेरे नाल लव हो गया,हाउसफुल२,क्या सुपर कुल है हम,ग्रँड मस्ती अशा यशस्वी चित्रपटांत त्याने उत्तम कॉमेडी भूमिका साकारल्या.

रितेश ने एक व्हिलन या सिनेमा मध्ये व्हिलन च काम केलं ज्याला पेक्षकांनी भर भरून दाद दिली. रितेश त्याचा बायको सोबतचा तेरे नाल लव्ह हो गया परत हाऊस फुल 2, क्या सुपर कूल हे हम सारखे चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपर हिट राहिले आहेत.

लय भारी

रितेश लई भारी हा मराठी सिनेमा केला आहे जो मराठीत सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. त्याच मराठी फिल्म प्रॉडक्शन आऊस पण आहे, ज्या अंतर्गत, जानेवारी २०१३ मध्ये रितेशने बालक-पालक ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. अभिनयाशिवाय,सेलेब्रिटि क्रिकेट लीग मध्ये 'वीर मराठी' नावाची टिम त्याची आहे तसेच तो या टिम चा कर्णधार देखिल आहे.

सामाजिक कार्य

रितेशने त्याच शहर लातूर मध्ये 'जलयक्त लातूर' या योजने साठी 25 लाख रुपयांचा निधी दिल आहे. जलकुक्त लातूर हे लातूर च्या पाणी संकटा वर मात करण्या साठीची योजना आहे.

हा लेख विकिपीडिया व तत्सम वेबसाईट वरून माहिती मिळवून लिहला आहे. जरी यात काही बद्दल सुचवायचे असतील तर marathimotivation@gmail.com ला मेल करा किंवा आमच्या फेसबुक पेज वर संपर्क साधा, तुम्ही कंमेन्ट करून देखील बद्दल सुचवू शकता.आणि हो लेख आवडला का नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या