June 8, 2023

सोपा वाटणारा मार्ग खरंतर कठीण मार्ग असू शकतो

एकदा एक जंगलात एक चंडोल पक्षी गात होता.त्याला कष्ट न करता सोपा मार्ग निवडायची सवय होती. एक माणूस अळ्यांनी भरलेला डबा घेऊन आला. चंडोल पक्ष्याने त्याला विचारलं “तू कुठं चालला आहेस? तुझ्या डब्यात काय आहे?” त्या माणसाने उत्तर दिलं, “डब्यात अळ्या आहेत आणि त्या घेऊन मी बाजारात चाललो आहे. बाजारात अळ्या देऊन पिसं घेणार आहे.” त्यावर चंडोल म्हणाला, “माझाजवळ खूप पिसं आहेत, मी एक पीस काढून तुला देईन म्हणजे मला अळ्या शोधाव्या लागणार नाहीत.” शेतकऱ्याने चंडोल पक्ष्याला अळ्या दिल्या आणि त्या बदल्यात पक्ष्याने त्याला आपले एक पीस उपटून दिलं.

दुसऱ्या दिवशी तसेच घडलं. दिवसामागून दिवस तसंच घडत गेलं आणि शेवटी चंडोल पक्ष्याच्या शरीरावर एकही पीस राहिलं नाही. आता त्याला उडताही येत नव्हतं आणि अळ्याही शोधता येत नव्हत्या. तो कुरूप दिसू लागला, त्याचं गाणं थांबलं आणि लवकरच तो मारून गेला.

तात्पर्य:-

तात्पर्य अगदी स्पष्ट आहे- चंडोल पक्ष्याला अन्न मिळवायचा जो मार्ग सोपा वाटलं होता, तो प्रत्यक्षात खडतर मार्ग निघाला.
आपल्या आयुष्यातही असंच घडतं. पुष्कळ वेळा आपण सोप्या मार्गाच्या, सहज साध्याच्या शोधात असतो, पण वास्तवात तोच मार्ग कठीण निघतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *