स्वामी विवेकानंद यांचे 19 मोटिव्हेशनल कोट्स(Quote)


स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद म्हणजे एक तेजाचे भांडारच होय. ते खूप तेजस्वी होते. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरा अध्यात्म समजवून सांगितले. त्यांचे विचार आज ही तरुणांन साठी खूपच प्रेरक आहेत.

1) आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.

2) समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.

3) स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

4) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

5) आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.

6) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

7) चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.

8) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

9) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

10) देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

11) दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

12) धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

  • चेतावणी ! स्टिव्ह जॉब्सचे 10 विचार जे तुमचे जीवन बदलू शकतात

13) परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.

14) पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.

15) भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.

16) व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

17) व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.

18) संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?

19) सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा:परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या