तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन

0
301
views

आयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे. ‘अम्मा’चे निधन झाल्याने त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले आहेत.

अभिनेत्री ते राजनेता

जयललिता यांचा राजकारणात येण्यापूर्वी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक होता. आईच्या आग्रहाखातर जयललिता या अभिनय क्षेत्राकडे वळल्या. ‘वेन्निरा अडाइ’ या तमीळ चित्रपटात आघाडीची भूमिका निभावल्यानंतर जयललिता यांची चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली. जयललिता यांनी 15 वर्षांच्या वयापासून तामिळ आणि तेलुगू मिळून जवळपास दीडशे चित्रपटांत काम केले. जयललिता यांनी हिंदी चित्रपट ‘इज्जत’मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र सहकलाकार होते.

1987 साली एमजीआर च्या निधना नंतर जयललिता हे त्याचे वारसदार म्हणून समोर आल्या. जयललिता यांचं राजकारणातील महत्त्व वाढलं आणि 1991 साली जयललिता जानकी रामचंद्रन यांच्यानंतर तामिळनाडूच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्या. 1996च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी अनेक वर्षं तामिळनाडूच्या राजकारणात वर्चस्व गाजवलं. जयललिता यांनी 1991-96, 2001, 2002-06, 2011-14 आणि 2015ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे.

ओ.पन्नीरसेल्वम तामिळनाडूचे मुख्यमंत्री

एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशीरा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूतील राजभवनात शपथविधी पार पडला.

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.