June 8, 2023

आज 7 डिसेंबर हा राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून आपल्या आवडत्या तिरंग्या बद्दल हि काही माहिती.

भारतीय राष्ट्रध्वज

२२ जुलै १९४७ रोजी म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.

तिरंग्याची रचना

भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्‍या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत.

ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :

रंग भावना
गडद भगवा त्याग
पांढरा शांती
हिरवा समृद्धी
निळा चोवीस तास

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).

डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.

  •  वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
  • मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
  • खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.
  • निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र‘ या नावाने ओळखले जाते.

तिरंग्या अगोदर चे काही ध्वज

ब्रिटीश भारताचा ध्वज

इ.स. १९०७ मध्ये मादाम कामांनी रचना केलेला ध्वज

होम रूळ चळवळीच्या वेळी रचना केले सप्तर्षी तारे अंकित असलेला ध्वज

 इ.स.१९२१ च्या काँग्रेस सभेमधील गांधीजींनी रचलेला ध्वज
इ.स. १९३१ मध्ये काँग्रेस ने स्वीकारलेला स्वराज्य ध्वज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *