सुप्रभात मित्रांनो दिवसाची सकाळ हि नेहमी आनंदी आणि चांगल्या विचारांनी झाली पाहिजे. याने तुमचा पूर्ण दिवस हा सकारात्मक जाईल. यश मिळवण्या साठी सर्वात महत्वाचं हेच तर असते.
या मुळेच सकाळी तुमच्या साठी खास सुविचार टाकण्यावर माझे जास्ती भर असते. चला तर बघू आजच्या काही खास आणि खूपच शक्तीशाली सुविचार फक्त तुमच्या साठी...
- काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे... पण, प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल...
- "आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि समजावं,आपला उत्कर्ष होतोय".
- आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल
- उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो.
- कष्ट इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल
- केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
- चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची
- जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर ... तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल ...
- जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा
- जेव्हा यश मिळवण श्वास घेण्या इतकच गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता
- तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा एक नवीन जग तुमच्या समोर असेल
- दृष्टी जी डोळ्यामुळे मिळते आणि दृष्टीकोन जो बुद्धीमुळे
- प्रत्येक संकटात संधी दडलेली असते
- प्रप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो
- फार सोपं वाक्य आहे. आपल्या मनाशी सारखं बोलत राहा तुम्ही कोणतेही ध्येय गाठु शकता
- कधी तुम्ही जिंकत असता कधी तुम्ही शिकत असता
- कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात
- आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल
- अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते ते म्हणजे तो अपयशी का आहे याच "कारण"
- "यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं"
मित्रांनो कसे वाटले तुम्हाला सुविचार ? मला कळवा, या साठी तुम्ही आमच्या फेसबुक पेज ला मेसेज करू शकता. माझी कामगीरी आवडली असेल तर नक्की कंमेंट करा. माणूस चुकीचा पुतळा असतो म्हणे या साठी तुम्ही देखील मला माझा चुका कळवून मला आणखी उत्तम काम करायला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.
0 टिप्पण्या