भारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे-संपत्ती ऐकून बसेल धक्का.



आज देशातील मंदिरांकडे पाहिले तर समझते की का भारताला 'सोने की चिड़िया' असे बोलले जायचे. भारतातील मंदिरे आपल्या संपत्ती मुळे पण खुप प्रसिद्ध आहेत, म्हणून देशातलेच नाही तर विदेशातील लोकही या मंदिरांना भेट देण्यासाठी येत असतात.

भारतातील अनेक मंदिरांकडे अमाप सपत्ती आहे, आणि यांतील अनेकांची संपत्ती दिवसागणिक वाढतच असते.आज आपण अश्याच काही मंदिरांची ही यादी बघणार आहोत. या मंदिरांच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

सिद्धिविनायक मंदिर, महाराष्ट्र




महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.या मंदिराला खूप सारे बॉलिवूड कलाकार, मोठे राजकारणी आणि उदोगपती भेट देतात.

या सोबत सामान्य लोक पण मोठ्या संख्येने सिद्धिविनायका चे दर्शन घेत असतात. या मंदिराला दररोज 25 हजार ते 2 लाख लोक भेट देतात. या मुळे मंदिराची वार्षिक उत्पन्न जवळपास ४८ ते १२५ कोटींच्या घरात आहे.

वैष्णोदेवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर




वैष्णोदेवी मंदिर हे भारतातील सगळ्यात जुन्या आणि श्रीमंत अश्या देवस्थान येते. हे मंदिर त्रिकुटा पर्वतांमध्ये कटरा येथे 1700 मीटर उंचीवर स्थित आहे.हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

सर्वाधिक भावीक भेट देणाऱ्या मंदिरांच्या यादीत वैष्णोदेवीचे मंदिर हे दुसऱ्या क्रमांकावर येते. दरवर्षी जवळपास 80 लाख भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनाला येतात. यातून मंदिराला ५०० कोटींचा नफा मिळतो.

शिर्डी साई बाबा मंदिर, महाराष्ट्र




साई बाबा हे कोणत्या एका धर्माशी निगडित नव्हते. त्यांनी जगाला फक्त एकच संदेश सदैव दिला. तो म्हणजे 'सबका मलिक एक' म्हणूनच आज शिर्डी येथे कोणत्याही जातीचा माणूस दर्शन देतो. या मुळेच भारतातील श्रीमंत मंदिराच्या यादीत शिर्डी देवस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या मंदिराकडे जवळपास 32 कोटी रुपयांचे चांदीचे दागिने आहेत. 6 लाख रुपये किमतीचे चांदीचे शिक्के आहेत. मोठ्या संख्येने येण्याऱ्या भाविकांन मुळे या मंदिराला वर्षाला ३६० कोटींच्या आसपास देगणी येते.

2.तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर, आंध्रप्रदेश.




2 ते 3 वर्षा खाली हे मंदिर सर्वात श्रीमंत होते. पण पद्मनाभस्वामी मंदिरात मिळालेल्या खजिन्या मुळे हे मंदिर दुसऱ्या स्थानी गेले. तिरुपतिला दररोज 50 ते 60 हजार भाविक भेट देतात. भेट देणाऱ्या भविकांच्या बाबतीत हे आज देखील प्रथम स्थानी आहे.

या मंदिरात जवळपास 1000 kg सोने आहे. एवढंच नाही तर लाडूंचा प्रसाद विकूनच या मंदिराला ७५ कोटींहून अधिक तर कापलेले केस विकून 40 कोटींहुन अधीक उत्पन्न होतो. तिरुपतीला वर्षाला ६०० कोटींहून अधिक रकमेची देणगी या मंदिराकडे येते. तिरुपती ची एकूण संपत्ती 52 हजार करोड एवढी आहे.

1.पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ.




पद्मनाभस्वामी मंदीर हे जगातील सगळ्यात श्रीमंत हिंदू मंदिर मानले जाते. केरळमध्ये असलेल्या या मंदिराकडे जवळपास वीस बिलियन डॉलर म्हणजे १ लाख ३६ हजार कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. ही रक्कम म्हणजे स्विजरलैंड देशाच्या एकूण संप्पति एवढे होय. त्रावन कोर राजाने पद्मनाभस्वामी मंदिराची स्थापना 18 व्या शतकात केली.

या मंदिरातील तळघरातील पाच खोल्यांमधून एक लाख कोटी रूपयांचे मौल्यवान दागिने, सोने, चांदीचे भांडे मिळाले आहेत. यात भगवान विष्णू ची विश्राम अवस्तेथ असलेली मूर्तीची किमंत 500 कोटीं वर आहे. या मंदिराची आणखी एक खोली स्थानिक लोकांच्या आंदोलना मुळे उघडले गेले नाही. यात मिळालेल्या खजिन्या पेक्षा 5 पट जास्ती सोन असू शकते असे इतिहास कर म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या