काही लोक असतात ज्यांना चांगल्या बाबतीत पण वाईट दिसते तर काही वाईटातील वाईट बाबतीत चांगले शोधतील. आज आपण अशाच एका व्यक्ती बदल माहिती घेणार आहोत. जिच्या कडून नियतीने सर्व काही घेतले पण तिला पराभव मान्य नव्हते. तिने जिद्दीच्या जोरावर ते करून दाखवले जे आज पर्यंत कोणी केलं नव्हतं. हि कहाणी आहे अनुरिमा सिन्हा ची जीने पायांनी अपंग असताना जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट ची यशस्वीरित्या चढाई केली.
अरुनिमा सिन्हा
अरुनिमा सिन्हा 12 एप्रिल 2011 रोजी पद्मावती एक्स्प्रेसने लखनऊहून दिल्लीला जात असताना, काही सोन साखळी चोरानी तिचा वर हल्ला केला. तिने त्या कृत्या चा विरोध केला तेंव्हा त्यांनी तीला धावत्या ट्रेन बाहेर फेकले. त्या वेळी बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या ट्रेनची तिला धडक बसली त्यात तीला गंभीर दुखापत झाली.
तिचा एक पाय तुटला होता, पायांमधून रक्त बाहेर पडत होत. एवढंच नाही परिस्थिती जास्ती भयवय होती. तिला खूप जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमेवर माश्या बसत होत्या अक्षरशा किडे आणि मुंग्या तिचे मास खात होते. अश्या परिस्थिती ती रात्र भर त्या दोन्ही रुळा मध्ये पडून होती. या रात्री 49 ट्रेन त्याचा पासून गेल्या. ती ओरडत होती पण तिचे ऐकणार कोणी नव्हते तिकडे.
सकाळी तिला हॉस्पीटल मध्ये भरती करण्यात आले. तिचा जीव वाचवण्या साठी तिचा डावा पाय काढून टाकावा लागला. या मधेच एक लाजिरवाणी गोष्ट घडली ती म्हणजे पोलीस आणि काही मीडिया नी अनुरिमा सोबत काही घडलेच नाही, तिने आत्महत्या करताना हि सुर्घटना घडली असे सांगितलं.
निर्धार
अरुनिमाला या गोष्टीने धक्काच बसला. मग तिने ठाम निर्धार केला, सर्वांची तोंडे बंद करण्याचा. तीने माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय ठेवले. शरीरदृष्ट्या धड धाकड, निरोगी लोकांना पण माउंट एवरेस्ट सर करणे खूप अवघड असते. त्यात एक पाय नसताना सर करण्याचा विचार करणे म्हणजे निव्वळ अशक्य गोष्ट होय.
तिने पहिली भारतीय महिला एव्हरेस्टवीर बच्छेंद्रीपाल हिच्या मार्गदर्शना खाली अरुनिमाने प्रशिक्षणाला सुरुवात केली. तिचे खडतर अभ्यास सुरू झाला. 53 दिवसाचा कठीण प्रशिक्षणा नंतर शेवटी, अरुणिमा सिन्हा ने 21 मे 2013 रोजी इतिहास रचला. तिने एव्हरेस्ट सर केला आणि जगातील पहिली अपंग महिला बनली जिने एव्हरेस्ट सर केलं.ती एवढ्या वर अजिबात थांबणारी नव्हती. तिने एव्हरेस्ट सोबत जगातील सर्वात जास्ती उंचीचे पाच पर्वत पण सर केलेलं आहेत.
उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरची रहिवासी असलेली अरुणिमा सिन्हा ही राष्ट्रीय स्तरावरील माजी व्हॅलीबॉल पटू देखील आहे. ति म्हणते तिला युवराज सिंग कडून परिस्थीती शी लढण्याची प्रेरणा मिळाली. अश्या जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी अरुणिमा सिन्हा या देशाच्या लेकीला सलाम.
लेख आवडला असेल तर शेर करा. कळू द्या सर्वांना अरुणिमा ची कहाणी. आणि हो कॉमेंट करून तुमचे मत मांडायला नका विसरू धन्यवाद....
1 टिप्पण्या
Khup khup sunder mahiti milali
उत्तर द्याहटवा