​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स | Google Account and Apps

गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स


मित्रांनो आज आपण अँड्रॉइड स्मार्टफोन मधील असलेल्या गुगल अकाऊंट आणि गुगल ऍप्स बद्दल माहिती घेणार आहोत. मी तरी गूगल चे ऍप्स आणि गूगल अकाउंट खूप एंजॉय करतो तर आज म्हंटले सर्वांना याचा बद्दल थोडी आणखी माहिती द्यावी.  एवढं नक्की हा लेख वाचून गूगल ऍप्स कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल.

गुगल अकाऊंट बद्दल थोडं


स्मार्टफोन मधील ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड हे गुगल कंपनी च्या मालकीचा आहे. गुगल अँड्रॉइड ला कोणत्याही मोबाईल बनवणाऱ्या कंपनीला विनामूल्य वापरण्यास देतो. या मुळेच आज आपल्याला कोणत्याही स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड कॉमन सापडतो. आता अँड्रॉइड गूगल चे असल्या कारणाने प्ले स्टोर मध्ये ऍप घेण्यासाठी गुगल अकाऊंट आवश्यक आहे. त्या मुळे जर तुमच्या कडे अँड्रॉइड स्मार्टफोन असेल तर गुगल अकाऊंट नक्की असेलच.

गुगल अकाऊंट चे वैशिष्ट्ये


  • ‌तुम्हला गूगल चे खूप सारे ऍप्स वापरण्यासाठी फक्त एक अकाऊंट ची आवश्यकता असते.

  • ‌तुमचा फोन हरवला तर गूगल अकाऊंट द्वारे तुमचे फोन नेमके कुठे आहे हे कळते. जर चोरीला गेले असेल तर फोन लॉक आणि त्यातला महत्वाचा डेटा डिलीट देखील करता येते.

  • ‌गुगल अकाउंट सोबत तुमच्या फोन मधील कॉन्टॅक्टस सिनक्रोनाईज करू शकता. सिनक्रोनाईज म्हणजे तुमच्या फोन मधील डेटा तुम्ही जशास तसे गूगल अकाऊंट वर पाहु शकता. जर तुम्ही मोबाईल मधून एखादा कॉन्टॅक्ट डिलीट केलात तर तो गूगल अकाउंट मधून देखील डिलीट होईल याला सिंक्रोनाईज म्हणतात.

  • ‌15 GB चे ऑनलाईन स्टोरेज

‌आणखी वैशिष्ट्ये गूगल ऍप्स च्या माध्यमातून बघूया.


1. गूगल ड्राईव्ह



गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स, आवडते pdf फाईल्स असे काहीही स्टोर करून ठेवू शकता ते पण ऑनलाईन. तुम्हीला दिलेल्या 15 GB स्टोरेज मध्ये हे सर्व स्टोर होईल.
तुम्ही आवश्यक पण कमी वापरात असलेले फोन मधील काही यात ठेवू शकता. मी तर माझा पासपोर्ट साईज फोटो आणि माझे सर्व शैक्षणिक कागद पत्रे त्यात ठेवले आहेत. मला जेंव्हा कधी त्यांची गरज लागते मी गुगल अकाऊंट कॉम्प्युटर वर लॉग इन करून त्यांचे प्रिंट काढून घेतो.

2.गुगल फोटोज



यात तुम्ही तुमचे फोटोज स्टोर करून ठेवू शकता. जर तुम्ही wifi वापरत असाल तर हा अटोमॅटिक तुमचे फोटोस नेट वर अपलोड करतो. हे फोटोज फक्त तुम्हीच बघू शकता इतर कोणीही नाही. जर फोटोज तुमच्या मोबाईल मधून चुकून डिलीट झाले तरी या ऍप्स मध्ये तुम्हाला ते सापडतील फक्त तुम्ही त्याला यात बॅकअप केलेलं असायला हवे. मी आज पर्यंत 3 मोबाईल बदलले आहेत तरी, मला माझे तिन्ही मोबाईल मधील फोटो या ऍप मध्ये दिसतात.


3.गूगल क्रोम




हा एक इंटरनेट ब्राउजर आहे. हा तुम्ही भेट दिलेल्या वेबसाईट आणि त्यात वापरलेला पासवर्ड लक्षात ठेवतो. जेंव्हा कधी तुम्ही परत त्या वेबसाईट ला भेट देता तेंव्हा बा ऑटोमॅटिक पासवर्ड आयडी टाकतो, तुम्हाला फक्त लॉग इन करायच काम असते. तुम्ही कोणत्या वेबसाईट ला कोणता पासवर्ड दिलात हे https://passwords.google.com/ या संकेत स्थळा वर बघू शकता. हा तुमचे पासवर्ड, बुकमार्क, जास्ती भेट दिली जाणारी वेबसाईट इत्यादी नोंद ठेवून तुम्हाला खूप फास्ट सर्व्हिस प्रदान करतो.

4.गूगल कीप




गूगल कीप मध्ये तुम्ही महत्वाचे टिपण काढू शकता. जसे आजच्या दिवसात काय काय महत्वाचे करायचे आहे याची यादी. एखादा हिशोब, डोक्यात आलेले विचार, कल्पना. उत्तम आइडिया असे बरेच काही लिहून ठेवू शकता. मी एखादा लेख मोबाईल मध्ये लिहला तर keep मध्ये लिहतो. तो लेख जसास तास कॉम्प्युटर वर दिसतो आणि कॉम्प्युटर वर काही बद्दल केले तर ते बद्दल मोबाईल च्या लेखात ऑटोमॅटिक दिसतात. असा आहे हा कीप.

जर तुम्ही नवीन फोन घेतलात तर फक्त गुगल अकाऊंट मध्ये लॉग इन केलं की तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट, ड्राईव्ह मधील डेटा, क्रोम मधील बुकमर्क्स, पासवर्ड, गुगल फोटोस मधील पर्सनल फोटो, कीप मधील सर्व मजकूर जशास तसा दिसेल. हि आहे गुगल ऍप्स आणि अकाउंट ची किमया.

कसा वाटला हा लेख, मला कल्पना आहे यातले बरेच काही किंवा सर्व तुम्हाला अगोदरच माहिती असेल पण आजचा लेख ज्यांना माहिती नाही त्यांना उपयोगी ठरेल. म्हणून लिहायला घेतला.

तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट्स मध्ये कळवा. आमच्या फेसबुक पेज वर देखील मेसेज करू शकता, आणि शेवटी atoz marathi च्या फेसबुक पेज ला लाईक करा. धन्यवाद.....

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या