मिक्की माऊस च्या जन्माची एक छोटी गोष्ट.

मिक्की माउस



​जगप्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर मिक्की माऊस तुम्हाला नक्की माहिती असेल. तुम्ही लहान असताना याचा एखादा तरी सिरीयल अथवा चित्रपट नक्की पाहिलेलं असेल. मिक्की माऊस घडवणारा वॉल्ट डिस्ने हा लहान सहान कार्टून फिल्मस बनवत असे. मग त्याला मिक्की गवसला, मिक्की ने वॉल्ट डिस्ने च भाग्यच उजळवले आणि त्याला चिक्कार पैसा आणि नाव मिळवून दिले.

वॉल्ट डिस्ने मिक्की सोबत


अश्या या मिक्की नावाचा उंदराची, कहाणी खूप रोचक आहे. वॉल्ट डिस्ने हे त्यांचा गरिबीच्या दिवसात त्यांचा, लहान सहान स्टुडिओ मध्ये काम करत बसले होते. त्या स्टुडिओ मध्ये बरेच उंदीर पळापळ करीत होते. त्या उंदरांची पळापळ वॉल्ट डिस्ने खूप तल्लीन होऊन बघू लागले. अचानक त्यांचा मनात उंदरालाच कार्टून कॅरेक्टर बनवण्याचा विचार आला. त्यांनी मिक्की माऊस बनवला.

सुरुवातीला त्यांनी या उंदीर रुपी कार्टून कॅरेक्टर ला मॉर्टीमर असे नाव ठेवलं होतं. पण नंतर बायको च्या अग्रहा खातर त्यांनी त्याच नाव मिक्की ठेवलं.अश्या या मिक्की माऊस चे आज म्हणजे 13 जानेवारी ला पहिली चित्रकथा प्रकाशित झाली होती त्या निमित्य, आज आपण मिक्की माऊस विषयी थोडी रोजक माहिती बघणार आहोत.

मिक्की बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस (माहिती)




  • पहिल्या बोल पटात मिक्की साठी खुद वॉल्ट डिस्ने यांनी आवाज दिलं होतं. त्या अगोदर मिक्की फक्त मूक पटतच दिसला होता.

  • मिक्की च्या हाताला फक्त 4 बोटे आहेत. यावर वॉल्ट डिस्ने म्हणतो की उंदराला 5 बोटे खूप जास्ती होतात.

  • त्याने त्याचा पहिला बोलपटात पहिला शब्द हॉट डॉग हा बोलला होता.

  • मिक्की चे मोठे दिसणारे कानांचे एंगल 105 अंश एवढं आहे.

  • 1978 मध्ये हॉलीवुड हॉल ऑफ फेम मध्ये जागा मिळवणारा तो प्रथम कार्टून कॅरेक्टर होता.

  • 1944 मध्ये दुसऱ्या विश्व युद्धा मध्ये अलायड फोर्सेज ने नॉरमंडी वर स्वारी केली तेंव्हा त्यांचा गुप्त अधिकाऱ्यांनी मिक्की माऊस याचा कॉड वर्ड म्हणून उपयोग केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या