भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं घर ज्याला अँटिलिया (Antilia) असे देखील म्हणतात. ते जगातील सर्वात मोठ आणि महागडं घर ठरले आहे. जगात या पेक्षा महागड्या वास्तू आहेत पण कोणाचे वयक्तिक मालकी असलेला घर म्हणून अँटिलिया हा सर्वात महाग घर आहे. या तर बघू काय आहे यात विशेष जे याला जगातील सर्वात महागडे घर बनवते.
अँटिलिया (Antilia) जगातील सर्वात महागडे घर
अँटिलिया (Antilia) हा जगातील सर्व प्रकारचा मागड्या घरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत. पहिल्या क्रमांकवर ब्रिटन चे बकिंघम पॅलेस हे येत. तुमच्या माहिती साठी बकिंघम पॅलेस मध्ये ब्रिटनची राणी राहते खरं पण ते घर सरकार च्या मालकीचं आहे. या साठी मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे घर व्यक्तिगत मालकीचे जगातील सर्वात महाग घर आहे. या घराची किंमत सध्याच्या बाजार भावाने जवळपास 6 हजार करोड एवढी होते. या 6 हजार किमतीच्या घरात 600 कर्मचारी आहेत. जे अहो रात्र या घरची देखभाल करतात. हे सर्व कर्मचारी या घरातच राहतात.
मजबुती
मुकेश अंबानींच्या अँटिलिया (Antilia) ची उंची जवळपास 170 मीटर म्हणजेच 560 फूट एवढी आहे. सामान्य बिल्डिंग मध्ये एवढ्या उंचीमध्ये 60 माजले बांधले जातात. पण अँटिलिया मध्ये फक्त 27 च मजले बांधले गेले आहेत. याच कारण आहे या घरात सामान्य पेक्षा जास्ती उंचीचे सिलिंग आहेत. हा घर जवळपास 48 हजार स्क्वेयर फुटामध्ये पसरले आहे. जे एक हजार एकर पेक्षा जास्ती जागा घेरले आहे. या घराला असे बनवण्यात आले आहे की हा जास्तीत जास्ती 8 रेक्टर स्केल एवढं क्षमतेचे भूकंपाचे झटके सहन करू शकतो.
सोयी सुविधा
हे घर साउथ मुंबई च्या “ऑफ पेडर रोड” वरुन “अल्टामाउंट रोड” वर स्थित आहे. अटलांटिक महासागराचा एका पौराणिक द्वीपाचा नावावर याचं नाव अँटिलिया असे ठेवण्यात आले आहे. या घराला शिकागो मधील आर्किटेक्ट “पार्किंन्स” यांनी डिजाईन केलं आहे. पण त्या डिजाईन ला सत्यात उतरवण्याच काम हे एका ऑस्ट्रेलियन कंस्ट्रक्शन कंपनी “लैग्टोंन होल्डिंग” ने केलं. अँटिलिया मध्ये 6 मजले हे फक्त आणि फक्त मागड्या कार्स साठी राखीव ठेवलेले आहेत. शिवाय यात 168 कार्स थांबतील एवढी जागा आहे. सातव्या मजल्यावर या कार्स साठी विशेष सर्व्हीस स्टेशन देखील बनवले गेले आहे. शिवाय घराचा छतावर 3 मोठे हेलिपॅड उभारलेआहेत.
अँटिलिया मध्ये 9 लिफ्टस असून , एक स्पा, एक मंदिर एक सोन्याची कलाकुसर असलेलं आणि फक्त चैण्डेलयर प्रकारचा काचेपासून बनवलेलं एक बॉल रूम, सोबत एक प्राइवेट सिनेमा गृह, एक योगा स्टूडियो, एक आइसक्रीम रूम, 2 किंवा तीन पेक्षा जास्ती स्विमिंगपुल देखील यात आहेत. या शिवाय या घरात आर्टिफिशियल बर्फा पासून बनवलेलं रूम पण आहे. या सर्व गोष्टीना चार चांद लावण्यासाठी एक सुंदर हँगिंग गार्डन देखील यात बनवलेले गेले आहे.
कसे वाटले हे घर. भारतात एवढी गरिबी असताना एवढा खर्च वयक्तीक घरा साठी करणे योग्य वाटते का तुम्हाला? कॉमेंट मध्ये कळवा. लाईक करा आमचे फेसबुक पेज अश्या रोचक माहिती साठी धन्यवाद…
Definitely I'm make a top business man in this world it's my vision
jar aplya deshache pantpradhan sarkari tijoritun 70 core rs dress sathi kharch karu shaktat tar ambani swatachya paishane ghar ka nahi bandhu shakat
बरोबर आहे…
नशिब
Comment:त्याचा पैसा आहै तो काईपन करो तुम्हाला येवङी चटनी काबर लागते आहै तुमच्या कङे पैसा आल्या नंतर तुमीही हेच करणार
Akleche tare todu naka
Ulat tyancha aplyala BHUSHAN watayla hawa
Thanks Ganesh
Mast sushil …