या वर्षात करा हे खास नववर्ष संकल्प

नववर्ष संकल्प

​बघता बघता वर्ष 2017 केंव्हा संपले हे कळलेच नाही. काल होते 31 डिसेंबर, हा दिवस म्हणजे पूर्ण वर्षा चे गोळा बेरीज करण्याचा दिवस.वर्ष भरात आपण काय प्रगती केली हे तपासण्याचा दिवस. हे सगळं झालं की, 2018 चा पहिला दिवसी येतो. हा म्हणजे येणाऱ्या संपूर्ण वर्षाचं प्लॅनिंग करण्याचा दिवस, नववर्ष संकल्प करण्याचा दिवस.

वर्षच्या पहिल्या दिवशी आपण काही तरी संकल्प करतो. तुम्ही देखील खूप सारे संकल्प केलेले असतील. जरी खूप सारे केले नसतील तरी एखादा दुसरा तर नक्कीच केलेलं असेल. या संकल्पात काही कॉमन संकल्प हे खूप लोकांनी केलेले असतात जसे आज पासून लवकर उठेन, व्यायाम नियमित करेन इत्यादी.

हे केलेले संकल्प आपण किती पाळतो हे वेगळे सांगायला नको. सुरुवातीला काही दिवस आपण संकल्प एकदम उत्साहाने पाळतो, पण त्या नंतर काहीना काही कारण देऊन संकल्प मोडून काढतो, म्हणून यंदा असा संकल्प करून पहा जो तुम्हाला जगण्याची प्रेरणा देईल.

मी तर संकल्प केलं आहे.  मराठी मोटिव्हेशन च्या माध्यमातून सर्वाना नेहमी मोटिव्हेट करायच, नवीन काही तरी वाचायला दायचं. नेमकी हीच गोष्ट मला पण मोटिव्हेटेड ठेवते. आज मी तुम्हाला काही संकल्प सुचवणार आहे जे तुम्हाला या नव्या वर्षात करायला हवे. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील हे संकल्प.

डायरी लिहणे


मी दर वर्षी आवर्जून डायरी लिहतो आणि तुम्हाला पण हाच सल्ला देईन. तुम्हाला दिवसातील आठ्वड्यातील किंवा महिन्यातील चांगल्या गोष्टी त्यात लिहून ठेवायच्या आहेत. बराच वेळा आपल्याला डायरी लिहायची असते पण लक्षात रहात नाही किंवा आपण विसरतो आणि शिवाय भीती असते कोणी ते वाचले तर.

याला उपाय म्हणून तुम्ही मोबाईल मध्ये journey हा अँप घेऊन त्यात डायरी लिहू शकता. या अँप ला पासवर्ड घालता येत शिवाय हा तुम्ही सुचवलेल्या वेळी तुम्हाला डायरी लिहण्याची आठवन हि करून देतो, आहे ना भारी?

  • मग या वर्षी डायरी लिहण्याचा संकल्प करा. तुम्ही या डायरी ला 31 डिसेंबर ला वाचाल. तेव्हा तुम्हाला पूर्ण वर्षाचा लेखा जोखा मिळेल. तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टींमध्ये हरवून जाल हे नक्की.

दिवतील उत्तम गोष्ट निवडणे




मागे काही दिवसा खाली व्हाट्सअप वर एक मेसेज फिरत होता. त्यात सांगितले होते की, आपण दररोच्या दिवसात काय चांगले घडले ते शोधायचं आणि आपल्या मित्रानं सोबत, किंवा जवळच्या व्यक्ती सोबत ते शेर करायच. हे तुम्ही दररोज डायरी मध्ये देखील लिहून ठेवू शकता.

  • मग या वर्षी संकल्प करा, दिवसातील चांगली गोष्ट शोधून लिहणाच किंवा फ्रेंड्स सोबत शेर करण्याच. या गोष्टी मुळे तुमच्यातील सकरात्मक वाढेल. दिवस कसाही गेला तरी तुम्ही त्या दिवसातली चांगली गोष्ट शोधाल.

मोबाईल आणि सोशल मीडिया


मी खूप लोकांची तक्रार ऐकतो कि त्यांना अमुक काम करायला वेळ नाही मिळत. पण असे लोक खूप वेळ हे फालतू खर्च करत असतात.जसे टीव्ही वर फालतू शो बघणे, व्हाट्सअप, फेसबुक वर आवश्यकते पेक्षा जास्ती राहणे इत्यादी. आजकाल प्रत्येक माणूस खूप वेळ हा मोबाईल मध्ये घालवायला लागलाय. म्हणून यावर देखील एक संकल्प कराच

  • संकल्प करा या वर्षी टीव्ही, मोबाईल, व्हाट्सअप किंवा फेसबुक कमी वापरण्याचा. याशिवाय तुम्ही तुमच्या क्षेत्राशी निगडीत पुस्तके किंवा महान व्यक्तींची जीवन चरित्र वाचू शकता. तुमचे स्किल्स वाढवू शकता.

स्वतः सोबत चर्चा




तुम्ही कधी आरशात बघितलं आहे का. तिकडे भेटणाऱ्या स्पेशल व्यक्ती सोबत बोललात का नसेल भेटलात तर भेटा. आपण पूर्ण जगाला ओळखतो पण स्वतःला ओळखण्याचा पर्यंत नाही करत. मग या वर्षात स्वतः मधल्या ग्रेट व्यक्ती ला भेट द्या.


  • या वर्षी संकल्प करा की दिवसातील काही वेळ स्वतः सोबत घालवाल. स्वतः सोबत चर्चा कराल. याने तुम्ही नेमके कोण, तुम्हाला नेमके काय करायच आहे. हे कळेल.

लक्षात ठेवा स्टिव्ह जॉब्स यांचे हे कोट्.

मी रोज सकाळी स्वःला आरशात पाहून विचारतो की ‘जर आजचा दिवस माझा जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर मी तेच कारेन का ? जे आज करणार आहे’. जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही’असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.

आकर्षक ड्रेसिंग





आज कालच युग फॅशनच आहे. काही फरक पडत नाही तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी. तुम्हाला आकर्षक पेहराव करायलाच हवं. आकर्षक पेहराव साठी तुम्हाला योग्य ड्रेसची निवड करायला हवं. याने तुम्ही आणखी कॉन्फिडेन्ट आणि पॉवरफुल दिसता.

  • या नवं वर्षात संकल्प करा की तुम्ही आकर्षक ड्रेसिंग कराल. हे तुमच्या आत्मविश्वासात भर टाकेल. याचे चांगले परिणाम तुम्हाला लवकरच दिसायला लागतील.

मग मित्रानो हे 5 संकल्प नक्की करा आणि संकल्प करून अमलात पण आणा. जर हा लेख किंवा हे संकल्प यादी आवडली असेल तर कॉमेंट्स करा  मराठी मोटिव्हेशन पेज ला लाईक करा. याने मला आणखी चांगले लिहायला प्रोत्साहन मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या