June 8, 2023

पु. ल. देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. देशपांडे म्हणून ओळखले जातात. आज त्याचे काही विनोदी किस्से आपण वाचणार आहोत.

किस्सा 1

त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले “बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो”.

किस्सा 2

वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,

तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,

“हा मझा मित्र शरद तळवलकर”

“हो का? अरे व्वा!” पु.ल म्हणाले होते, “चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,

हा चांगलाच असरणार!”

“हे कशावरून म्हणतोस तू?” वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.

“अरे, याच्या नावावरून कळतेय ते!” पु.ल. म्हणाले. याच्या नावात

एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.

म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!”

किस्सा 3

पु.लं.च्या “उरलंसुरलं” ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद
” मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा

आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे

भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ‘ प्लीज जरा

मोठ्याने बोलता का? ‘ असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज

खाली येतो की नाही बघ.”

किस्सा 4

एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.

बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. “तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार”.

ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.

“तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?”

किस्सा 5

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले,”रेडिओवरच्या मराठीतीन ‘अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल’ असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मला कळेना! आता कळलं. ‘सुत्र’ हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती ‘मंगळसुत्रा’कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!”

किस्सा 6

एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,

तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की

माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक  ज्ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.

माझ्या खोलीत मी  ज्ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.

तर पु.लं. म्हणाले “अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील,  ज्ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?”

किस्सा 7

दिल्लीच्या प्रकाशकांच्या सभेत पुलं म्हणाले होते, “कसायानी आपल्या सभेचे अध्यक्षपद एखाद्या गायीला द्यावे तसे वाटतेय.

किस्सा 8

नाशिकला कॉलेजच्या स्नेहसंमेलनात केलेले धमाल भाषण. या भाषणात पुलं म्हणाले होते, ‘मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या मुलीला  विचारले, तुम्हाला ज्ञानेश्वरांचे काय काय आहे? त्यावर ती म्हणाली, ‘ १० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे’ मी पुढे विचारणार होतो कि, ‘माझे साहित्य किती आहे?” पण पहिल्या उत्तराने मला पहिला प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण  ज्ञानेश्वरच १० मार्कांचा तर मला एक लक्षांश मार्क असेल कि नाही कोणास ठाऊक!”

किस्सा 9

पु. ल. देशपांडे व मी आकाशवाणीवर एकत्र काम करत होतो. तेव्हा करारपद्धत असल्याने पगारात करार संपेपर्यंत वाढ होत नसे. एकदा आकाशवाणीच्या 27 केंद्रांचे प्रमुख संचालक आले होते. पुलंकडे पाहून ते म्हणाले, “देशपांडे, तुमचे पोट खूप वाढले आहे.’ त्यावर पुलंनी तत्परतेने उत्तर दिले, “”धिस इज द ओन्ली इन्क्रीमेंट आय ऍम गेटिंग……” – मंगेश पाडगावकर

किस्सा 10

एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,” आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!”

संदर्भ:-http://cooldeepak.blogspot.in

कसे वाटले हे किस्से मित्रांनो. तुम्हाला कुठला आवडला. जरूर कळवा कॉमेंट करा धन्यवाद.

1 thought on “पु. ल. देशपांडे यांचे धमाल विनोदी किस्से जरूर वाचा

  1. छान…

    एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,” आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *