स्टीफन हॉकिंग (stephen hawking) ज्याने मृत्यू ला नमवले.

स्टीफन हॉकिंग

1962 मध्ये हिवाळी सुट्टी साठी 20 वर्षांचा स्टीफन घरी आला होता. तो आनंदात होता कारण त्याच 21 वे बर्थडे जवळ येत होते. त्याचं हे आनंद कदाचित नियतीला मान्य नसावे. तो त्याचा बर्थडे च्या काही दिवसा अगोदर आजारी पडला. सुरुवातीला त्याला आणि त्याचा घरच्या ना तो लवकर बारा होईल असे वाटले. पण त्याचा प्रकृतीत कसलाच बदल होत नव्हता. स्टीफन चा त्रास वाढत चालला होता, उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवसा दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले.

स्टीफन हॉकिंग लग्नाचा वेळी

स्टीफन यांना झालेल्या असाध्य रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगात हळूहळू शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. रोग्याला अगोदर च्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते.

स्टीफन हॉकिंग याना त्यांचा डोक्टर्सनी जेमतेम दोन वर्षे जगतील असे सांगितलं. स्टीफन उध्वस्त झाला, तो खूपच निराश झाला. अक्षरशा त्याचा डोकावर थोडा परिणाम झाला. तो काही दिवस घरातच रडत पडला होता.  नंतर त्याने ही तेच केलं जे आपण त्या वेळी केलं असते. त्याने नक्की केले की राहिलेले 2 वर्ष मनसोक्त जगायचं.

स्टीफन काही काळ मनसोक्त जगला देखील, पण हळू हळू त्याचे एक एक अवयव निकामी होत होते. त्याला आता इस्पितळात भरती करावे लागले. आता तो चांगलाच निराश झाला. पण एके दिवशी स्टीफन ने असे काही बघितले की त्याचं आयुष्यच त्याने पालटणार होते. त्याने त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहिले. त्या रोग्याला पाहून स्टीफन ला देखील आशेचे किरण दिसू लागले. त्यानं देखील झगडायचे ठरवले. आणि काय आश्चर्य 2 वर्षात मारणारा माणूस आज ही जिवंत आहे.

अवयव निकामी झाल्याने स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.

संशोधन


अश्या या माणसाने कृष्णविवर (black hole) या विषया वर आपली थेरी मांडली. या साठी त्याने आईन्स्टाईन यांचे खूपच अवघड अश्या सापेक्षता वादाचा सिद्धांताचा आभास केला. शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ असलेल्या होकिंग्स यांनी अवघड गणिते मनातल्या मनातच सोडवली. शेवटी त्यांनी कृष्णविवरे देखील किरणोत्सर्ग करीत असावीत, असा निष्कर्ष त्यांनी काढला. याला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली

स्टीफन हॉकिंग हे त्यांच्या पुस्तकांमुळे आणि जाहीर कार्यक्रमांमुळे खूप लोकप्रिय आहेत. त्यांचं अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम  हे पुस्तक जगातील बेस्ट सेलर बुक्स च्या यादीत येते.


स्टीफन हॉकिंग झेरो  ग्राविटी मध्ये


स्टीफन हॉकिंग म्हणतात

 मी चालू फिरू शकत शकत नाही, मला कंप्युटर च्या माध्यमातून बोलावं लागतं, पण मी माझा मेंदूने (विचारांनी) स्वतंत्र आहे.

खरंच आहे मित्रानो आपल्या कडे सर्व अवयव असून आपण डोक्याने. स्वतंत्र नाही, आणि स्टिफन सारखे लोक डोक्याने स्वतंत्र असतात.

एवढं सगळे वाचून मला तर वाटते, आपल्या जीवनातल्या कसल्या पण अडचणी बाबतीत आपल्याला तक्रार करायचा अधिकारच नाहीये. कारण स्टीफन हॉकिंग सारख्या लोकांच्या तुलनेत आपले दुःख आणि अडचणी याना कसलेच महत्व राहत नाही. आणि हो एक नक्की सांगावंसे वाटते, या पेज ला बुकमार्क करून घ्या. जेंव्हा कधी आयुष्यात निराशा जाणवेल हा लेख वाचा बघू कसली असते निराशा.

लेख आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा.... धन्यवाद. मराठी मोटिवेव्हेशन पेज ला लाईक करा.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या