नकारात्मक लोकांना कुठल्या हि संधी मध्ये काहीना काही अडचण दिसते, तर सकारात्म लोकांना
अनंत अडचणीत देखील संधी दिसत असते. आज आपण अशाच एका सकारात्म व्यक्ती बदल माहिती घेणार आहोत. ज्याचा आयुष्यात अन्न पाण्या सारख्या मूलभूत गोष्टींसाठी देखील संघर्षच लिहलं होत. त्यात त्या माणसाने जिद्दीच्या जोरावर आयुष्यातील खाच खळगे भरत, अमेरिका मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा यादीत आपले नाव शामिल केलं.
आज आपण व्हाट्सअप ला बनवणाऱ्या जान कोउम( jan koum) बद्दल माहीती घेणार आहोत. ज्या जान कोउम ला फेसबुक ने त्याचा क्षमतेवर बोट ठेवून नौकरी नाकारली, त्याच फेसबुक ला कोउम ने त्याने तयार केलेला व्हाट्सअप 19 बिलियन डॉलर्स मध्ये विकले. ही रक्कम भारतीय करन्सी मध्ये जवळपास 1 लाख करोड एवढा होतो.
सुरुवातीचा काळ
कोउम च जन्म हे युक्रेन मध्ये झालं होतं. त्याचे वडील बांधकाम मजूर होते. तर आई एक गृहिणी होती. त्याचं आयुष्य खूप खडतर होते. ते 2 वेळच्या अन्न पाण्यासाठी देखील ते महाग होते. त्या वेळी युक्रेन मध्ये वातावरण खूप अस्थिर होत. मग त्यांनी युक्रेन सोडून अमेरिका मध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.
जान फक्त 16 वर्षाचा असताना त्याचा कुटूंबानी माउंटन व्हिएव (mountain view) कॅलिफोर्निया येथे स्थलांतर केलं. त्यांना एका सामाजिक संस्थेने त्यांना दोन खोल्यांचं एक लहान घर देऊ केलं होतं. ईथे देखील त्यानां खूप संघर्ष करावा लागला. घर चलवण्या साठी कोउम च्या आईने घरातच बेबी सीटर काम करायला सुरुवात केली. जान कोउम देखील पेपर टाकणे, दुकानातील फारश्या पुसणे इत्यादी कामे करून आईला आर्थिक मदत केली. या काळात कोउम ला तासंतास जेवण मिळवण्या साठी अन्नछत्रा बाहेर उभे राहावे लागत.
पण म्हणतात ना वेळ चांगला असो किंवा वाईट ते नक्की बदलत असते. जान कोउम चे देखील दिवस हळू हळू बदलत होते. त्याने 19 वर्षी एक कॉम्प्युटर विकत घेतला त्याला प्रोग्रामिंग ची आवड होती. तो सर्व काही पुस्तके वाचून स्वतः शिकला होता. त्यांने काही दिवस एका हॅकर ग्रुप WooWoo मध्ये हॅकर म्हणून ही काम केलं आहे.
पुढे कोउम ने सॅन जोश स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतलं. त्या सोबत एर्णस्ट अँड यंग (Ernest and Young) या कंपनीत रात्री सिक्युरिटी टेस्टर म्हणून जॉब करत असे. शिक्षणा नंतर त्याने yahoo येथे जॉब करायला सुरुवात केली येथेच त्याला एक मित्र मिळणार होता ज्याचा सोबत तो इतिहास रचणार होता.
ब्रायन ऍक्टन सोबत ओळख
Yahoo मध्ये कोउम ने 10 वर्षा काम केलं आहे. त्या काळात त्याला ब्रायन ऍक्टन (Brian Acton) नावाचा जिवलग मित्र मिळाला, तो yahoo मध्ये advertising सिस्टीम सांभाळत असे. त्यांचे एक दुसऱ्या सोबत खूप जास्ती पटत असे. या काळात ते एकमेकांचे खूप जिवलग मित्र झाले. नंतर कोउम आणि ऍक्टन दोघानी स्वतःच स्टार्टअप सुरु करायच विचार केला. फेसबुक आणि ट्विटर सारखं मोठं निर्माण करण्याचा ध्येयाने त्यांनी 2007 साली yahoo कंपनीला ला राजीनामा दिला.
जान कोउम आणि ब्रायन एक्टन |
पहिला वर्ष त्यांना काहीच जमले नाही. त्यांचा कडे असलेले पैसे हळू हळू संपत होते. निराश होऊन त्यांनी परत जॉब करायचं ठरवलं. त्यांनी फेसबुक आणि ट्विटर मध्ये जॉब साठी अप्लाय हि केला. पण इंटरविव्ह मध्ये त्यांना नाकारण्यात आले. कोउम आणि ऍक्टन दोघानी हा काळ खूपच अवघड असल्याचं ट्विर च्या माध्यमातून सांगितलं होतं.
पण कोणीतरी महान व्यक्तीने म्हंटले आहे की
सध्या तुमच्या जीवनात कठीन काळ असेल तर समजुन घ्या येणार काळ त्या प्रेक्षा कठीण असेल पण त्या नंतर मात्र सर्व चांगले आणि सोप्पे असेल.
त्याच प्रमाणे कोउम आणि ऍक्टन यांचं होतं. कोउम ने 2009 मध्ये अप्पल चा i-phone घेतला. आणि त्याला फक्त 7 महिने जूणा अँप स्टोर च्या क्षमते ची कल्पना आली. त्याला कळाले की मोबाईल ऍप्प तयार करणे खूप फायदाचे होऊ शकते.
whatsapp चा जन्म
कोउम ला त्याचा एका रशियन मित्राने इस्टंट मेसेजिंग ची कल्पना सुचवली. बाजारात इन्स्टंट मेसेजिंग ऍप्पस होत्या, जसे ब्लॅकबेरी मेसेंजर इत्यादी पण ते फक्त ब्लॅकबेरी च्या मोबाईल पुरतेच मर्यादित होत्या. नेमके हेच कोउम ने हेरले, त्याने कोणत्या ही फोन वर चालेल असा इन्स्टंट मेसेजिंग ऍप बनवायचं ठरवलं. त्याने तयार केलेल्या ऍप्प साठी whatsapp हे नाव नक्की केलं, आणि 24 फेब्रुवारी 2009 मध्ये कॅलिफोर्निया येथे स्वतःची whatsapp.inc कंपनी स्थापन केली.
सुरुवातीचा एक वर्ष व्हाट्सअप्प ला अपेक्षा प्रमाणे यश मिळाले नाही. कोउम हा परत निराश होऊन व्हाट्सअप्प बंद करण्या बाबत ऍक्टन कडे बोलणी केली. ऍक्टन ने त्याला आणखी एक वेळा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला, आणि झालेही तसंच वापरण्यास सोप्पे आणि एकही जाहिरात नसलेला ऍप म्हणून व्हाट्सअप्प प्रसिद्धीस येऊ लागला. तो एवढा प्रसिद्ध झाला की फक्त 3 वर्षातच ऍप्पल च्या ऍप्प स्टोर मध्ये सर्वात जास्ती डाउनलोड केला जाणारा ऍप्प बनला. व्हाट्सअप्प आणि कोउम दोघांचे दिवस फिरले.
स्थापनेच्या फक्त 5 वर्षी नंतरच व्हाट्सअप्प ने यशाचे मोठे मोठे शिखर सर केले होते. अखेर फेसबुक च्या संस्थापक मार्क झुकरबर्ग याने व्हाट्सअप साठी 19 बिलियन डॉलर ची ऑफर कोउम कडे ठेवली. 19 बिलियन म्हणजे जवळपास 1 लाख 19 हजार करोड रुपये होतात. शिवाय व्हाट्सअप्प च्या मुख कार्यकारी मंडळा वर कोउमलाच ठेवण्याचा आश्वासन दिले गेले तेंव्हा कुठे कोउम ने 19 बिलियन डॉलर मध्ये व्हाट्सअप्प फेसबुक कंपनी ला विकायचं निर्णय घेतला. आणि गंमत म्हणजे या फेसबुक ने कोउम याला नौकरी नाकारली होती.
कोऊम फेसबुक च्या करारावर सही करताना. कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रात. |
त्याने फेसबुक च्या ऑफर वर सही करण्यासाठी तेच ठिकाण निवडले जिथे, त्याने आयुष्यात सर्वात जास्ती कष्ट घेतलं होतं. जिथे त्याला तासंतास अन्ना साठी थांबावं लागलं. त्याचं कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रात त्याने फेसबुक च्या करारावर सही केली. जान आता जरी श्रीमंत झाला असला तरी तो त्याचे गरिबीतले दिवस विसरला नाही.
कोऊम फेसबुक च्या करारावर सही केल्यानंतर . कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रा बाहेर. |
मित्रांनो आयुष्य असच असते. हजार कष्ट असले तरी आपले दिवस कधी ना कधी येणार या वर विश्वास ठेवायचं असते. यश मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची वाटते मला ती म्हणजे मैदानात टिकून राहणे बाकी सर्व ऑटोमॅटिक होतं .
कसा वाटलं जान किम ची जबरदस्त कहाणी आवडली आसेल तर नक्की शेर करा. आणि हो aoz मराठी मध्ये दर रविवार अश्या अविश्वसनीय लोकांची अविश्वसनीय कहाणी तुमच्या समोर ठेवणार आहे त्या साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. एकही काहाणी मिस करू नका. कॉमेंट करून हा लेख कसा वाटला हे कळवाच धन्यवाद.....
8 टिप्पण्या
Very nice
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवाI LIKE YOUR STRUGGLE STORY AND VERY APPRECIATED.............
उत्तर द्याहटवाI LIKE YOUR STRUGGLE STORY AND VERY APPRECIATED………….
उत्तर द्याहटवाVery nice and good work admin.
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाvery inspirational
उत्तर द्याहटवा