25 शक्तीशाली विचार....विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )


आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात या सुंदर मराठी सुविचानी करा. या सुविचारानी तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल एकदा नक्की वाचा, सुविचार आवडले तर whatsapp वर मित्रांना शेर करा धन्यवाद

सुविचार यशशास्त्र सुविचार




सुविचार 1 :

माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.



सुविचार 2:

तुम्ही नर्कातुन जात असाल तर चालणं सुरु ठेवा. नर्कातून बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे.



सुविचार 3:

स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.



सुविचार 4:

सोप्पी होण्याआधी कुठलीही गोष्ट कठीण असते.



सुविचार 5:

जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.



सुविचार 6:

एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.



सुविचार 7:

चालता आणि धावता येण्याआधी माणसाला रांगावं लागतं.



सुविचार 8:

अपयशाचा खात्रीचा मार्ग:
भेटेल त्या प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करा.



सुविचार 9:

काम उद्या वर ढकलणे क्रेडिट कार्ड वापरण्या सारखे आहे. बिल मिळेपर्यंत फार मजा येते.



सुविचार 10:

ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही.



सुविचार 11:

यंत्रांनी कामे केली पाहीजे. माणसांनी विचार करायला पाहिजे.
IBM चे घोषवाक्य



सुविचार 12:

नेहमी लक्षात ठेवा. उघडण्या साठी दुसरे दार तयार ठेवल्या शिवाय निसर्ग पहिले दार कधीच बंद करत नाही.



सुविचार 13:

तुम्ही जे आत्ता पर्यंत करत होतो तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्ता पर्यंत मिळत होतं.



सुविचार 14:

आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल.



सुविचार 15:

ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.



सुविचार 17:

विद्यार्थी तयार झाला की शिक्षक हजर होतो.
-चायनिझ म्हण



सुविचार 18:

जेंव्हा माणूसएखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरश संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते.



सुविचार 19:

विचार बदला, जीवन बदला.



सुविचार 20:

योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती योजना अमलात आणताना दहा मिनिटे वाचवते.




सुविचार 21:

अपयश जितकी जास्त, यश तितकं मोठं.



सुविचार 22:

बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते. पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही.




सुविचार 23:

निश्चयी माणसाला कोणी थांबवू शकत नाही. अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरजच पडत नाही. तो जागेवरून निघतच नाही.



सुविचार 24:

तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कुठे पोहचाल कोणास ठाऊक.



सुविचार 25:

ध्येय निश्चित करा.
तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका.
ध्येयाने झपाटून जा.
यश तुमच्याकडे अक्षरशा ओढलं जाईल.

Source: यशशास्त्र पुस्तक
लेखक: अब्दुल सलाम चाऊस

मित्रांनो कसे वाटले आजचे हे शक्तीशाली यशशास्त्र सुविचार आवडले असतील तर नक्की शेर करा. दररोज एक सुविचार whatsapp status म्हणून ठेवा. आणि हो आमचे फेसबुक पेज लाईक करा अश्या शक्तीशाली सुविचारांसाठी. धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या