हे पाहून जॉनला फार वाईट वाटले आणि त्याने मालकाकडे हा विषय काढला. मालक म्हणाला, "तू पाच वर्षांपूर्वी जितकी झाडं तोडत होतास तितकीच झाडं आजही तोडतोस. आम्हाला काम करणारी माणसं हवीत. तुझी उत्पादन क्षमता वाढली तर तुझा पगार आम्ही आनंदाने वाढवू."
जॉन कामाला लागला. जॉन ने खूप प्रयत्न केला पण त्याला अधिक झाडं तोडता येईनात. निराश होऊन तो पुन्हा मालकाला भेटला. मालकाने जॉनला बिलचा सल्ला घेण्याची सूचना केली. तो म्हणाला, ''कदाचित आपणा दोघांना माहीत नसलेली एखादी महत्वाची गोष्ट बिलला माहीत असेल."
जॉन ने थेट बिलला गाठलं. जॉनने बिलला विचारल्यावर तो म्हणाला, "एक झालं तोडलं की मी दोन तीन मिनिटे थांबतो आणि कुऱ्हाडीला धार लावतो. तू तुझा कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होतीस?" या प्रश्नाने जॉनचे डोळे उघडले त्याला त्याचा प्रश्नाचं उत्तर मिळालं.
मी तुम्हाला विचारतो की तुम्ही आपल्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होती? गतवैभव आणि शिक्षण फारसे उपयोगी पडत नाहीत. आपण आपल्या बुद्धीला सदैव धारधार ठेवलं पाहिजे.
0 टिप्पण्या