स्टीव्ह जॉब्स - एक क्रांतीकारी वादळ | Steve Jobs Marathi Biography

स्टीव्ह जॉब्स

जागतिक तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा बदलवून टाकणाऱ्या स्टीव्हन पॉल जॉब्स यांचा वादळी जीवना वर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जात असे. त्याला सुबक आणि सौंदर्यपूर्ण उपकरणे बनवण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःलाे वाहून घेतले होते. त्याने बनवलेले उपकरणे जसे की मकॅन्टोस कॉम्प्युटर, आयफोन, आयपॉड, आयपॅड अश्या उपकरणांनी तंत्रज्ञान विश्वात क्रांती घडवून आणली.

1960 चं दशक हे मेनफ्रेम कॉम्प्युटर्सचं होत. आकाराने खूपच मोठे आणि खूप महाग असे हे कॉम्प्युटर. शिवाय वापरायला पण ते अवघड असतं म्हणून मोठ्या मोठ्या कंपनीनं मध्ये तज्ञ मंडळीच ते वापरत. नंतर आले 1970 चं दशक हे मिनी कॉम्प्युटर्सचं दशक असे म्हणता येईल. हे कॉम्प्युटर्स मेनफ्रेम पेक्षा कमी किंमतीचे असल्या मुळे लहान मोठे कंपनी याला वापरू लागले. पण सामान्य माणूस वापरू शकेल असे कॉम्प्युटर आणखी कोणी बनवले नव्हते. IBM सारख्या मोठ्या कंपनींना लहान कॉम्प्युटर्स बनवण्यात खास रस नव्हते. त्यांना सामान्य माणूस वापरू शकेल असा कॉम्पुटर बनवण्या मध्ये जास्ती फायदा ही नाही असे देखील वाटत होते.

स्टीव्ह आणि वॉझ या दोघानी बनवलेला PC

पण स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉझनिएक (वॉझ) या दोन स्टीव्ह मंडळींनी मात्र पहिला वैयक्तिक कॉम्पुटर (personal computer) बनवून, IBM सारख्या बड्या कंपनीला ते किती चुकीचा विचार करत आहेत हे दाखवून दिले. स्टीव्ह आणि वॉझ या दोघानी बनवलेला PC हा वापरण्यासाठी एकदम सोप्पा, लहान आकाराचा शिवाय मिनी कॉम्प्युटर पेक्षा खूपच कमी किमतीचा होता. बघता बघता लोकांना PC नावाचा हा प्रकार भन्नाट आवडला. या सोबतच स्टीव्ह जॉब्स याने जग बदलायला सुरुवात केली. या PC मुळेच आज हा लेख तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये वाचत आहात हे आवर्जून सांगावे वाटते.

अप्पल ची स्थापना

1975 च्या सुरुवातीला एका गॅरेज मध्ये स्टीव्ह जॉब्स आणि सिव्ह वॉझ यांनी अॅप्पल ची स्थापना केली होती. त्यांचा कंपनी चा असे म्हणण्या पेक्षा त्यांचा पहिला कॉम्प्युटर म्हणजे अॅप्पल 1 होय. या कॉम्प्युटर ला बनवण्यासाठी जॉब्स ने त्याची फोक्सवॅगन बस 1300 डॉलर्सला विकली. वॉझनंही त्याचा एचपी-35 कॅलकुलेटर 200 डॉलर्स ला विकला. असे त्यांचा कडे 1500 डॉलर्स होते. पण त्यातही जॉब्स याचा बसमध्ये बिघाड झाल्याने त्याला 500 परत करावे लागले. मग त्यांचा कडे 1000 पेक्षा कमी डॉलर्स शिल्लक होते.

स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉझनिएक (वॉझ)

त्या काळी बाईट नावाचं काम्पुटर्स विकण्याचं एक दुकान होतं. त्या दुकांनाने स्टीव्ह ला 50 कॉम्प्युटर्स ची ऑर्डर दिली आणि प्रत्येक कॉम्प्युटर मागे 500 डॉलर्स ही देऊ केले. या मुळे कंपनी कडे थोडा पैसा आला. मग स्टीव्ह ने काही अनुभवी मंडळींना कंपनीत घेऊन कंपनी ला व्यवसायिक स्वरूप दिलं. कंपनी आता गॅरेज बाहेर येऊन मोठी होत होती. याच वेळी व्हिजिकॅल्क नावाचा एक स्प्रेडशीटचा प्रोग्रॅम फक्त अॅप्पल मधेच चालत असे त्या मुळे देखील अॅप्पलची विक्री खूप वाढली. 1980 च्या डिसेंबर मध्ये जेंव्हा कंपनी पब्लिक झाली, तेंव्हा जॉब्ज, वॉझ आणि मार्कुला नावाचा त्यांचा सहकाऱ्याकडे प्रत्येकी 23 कोटी डॉलर्स मालमत्ता आली होती.

यात एक मजेदार किस्सा म्हणचे स्टीव्हने कंपनी पब्लिक होण्या अगोदर रॉन वेन नावाचा कलाकाराला आपल्या कंपनीचा लोगो आणि ब्रोशर तयार करण्यासाठी सांगितलं. त्यासाठी त्याला पैशांऐवजी कंपनीचे 10 टक्के हिस्सेदारी देऊ केली. प्रथम वेन तयार झाला पण कालांतरानं उगाचच जोखीम नको म्हणून त्यानं तो 10 टक्के हिस्सा 300 डॉलर्स ला विकला. इंटेल च्या एका इंजिनीअरनं सहज म्हणून तो विकत घेतला होता. दुर्दैवाची गोष्ट अशी की, 1980 मध्ये अॅप्पल कंपनी पब्लिक झाली आणि त्या 10 टक्के शेअर्सची किंमत 6.7 कोटी डॉलर्स झाली. रॉन वेननं या मूर्खपणा बद्दल स्वतःला किती बडवून घेतलं असेल देव जाणे.

अॅप्पल मधून हकालपट्टी


या नंतर मात्र अॅप्पल 3 लिसा आणि मॅकिंटॉस हे कॉम्प्युटर फ्लॉप झाले. या मुळे अॅप्पल कंपनीत अंतर्गत राजकारण सुरु झालं आणि चक्क स्टिव्ह जॉब्स यालाच कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला गेला. जॉब्सने या गोष्टीपासून निराश न होता  स्वतः ची नेक्स्ट नावाची कंपनी स्थापन केली. त्या कंपनीला देखील यशस्वी करून दाखवलं. अॅप्पल कंपनी ने नमते घेत नेक्स्ट ला 40 कोटी डॉलर्स ला विकत घेतले आणि स्टिव्हला परत कंपनी मध्ये बोलावलं. आणि थोडयाच काळात स्टिव्ह जॉब्सच कंपनी चा अध्यक्ष झाला.

पण एवढं सर्व होत असताना अॅप्पल ने कॉम्प्युटर विश्वात बलाढय कंपनी बनण्याची संधी मात्र गमावली होती. आज जेथे मायक्रोसॉफ्ट आहे तेथे अॅप्पल असू शकले असते पण असे झाले नाही. याला 2 प्रमुख कारणे आहेत, एक म्हणजे अंतर्गत राजकारण आणि दुसरे म्हणजे त्यांनी त्याचं सॉफ्टवेअर त्यांचा खेरीज इतरांना वापरुच दिले नाही. नेमके इथेच बिल गेट्स नी बाजी मारली.

GUI (Graphical user interface)

अगोदर कॉम्प्युटर वापरण्यासाठी कमांड सिस्टमच अस्तित्वात होती. ज्यात टायपिंग करून कॉम्पुटर ला कमांड म्हणजे आज्ञा द्यावी लागत असे. उदाहरणात जसे एखादे फोल्डर उघडायचे असेल तर ओपन टाईप करू पुढे त्या फोल्डर चे नाव लिहावे लागत असे. म्हणजे आज तुम्ही जे डेस्कटॉप बघता त्यात आयकॉन्स असतात तसे काहीही त्या कॉम्पुटर मध्ये नसायचे. फक्त एक एडिटर असायचा त्यात टाईप करून आवश्यक ती फाईल ओपन क्लोज इत्यादी करून वापराची सोय होती.

या काळात स्टिव्ह जॉब्सने GUI (Graphical user interface) ग्राफीकल यूजर इंटरफेस ही संकल्पना असलेलं कॉम्प्युटर बाजारात आणून एकच  खळबळ माजवून दिली. GUI मुळे कोणीही अगदी आडाणी माणूस देखील कॉप्युटर वापरू शकेल असे झाले. GUI मुळे डेस्कटॉप आले त्यात आयकॉन्स आले वापरकर्त्याला फक्त माऊस इत्यादी वापरून क्लिक करायचा आणि GUI त्याला कमांड मध्ये कन्व्हर्ट करून कॉप्युटरला आज्ञा देऊन आवश्यक ते काम करून घेईल अशी सोय झाली.

या मुळे कॉम्प्युटर वापरणे खूपच सोप्पे झाले. आज कोणतीही गोष्ट घ्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर सर्व उपकरणांमध्ये GUI वापरला जातो. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की हा GUI मायक्रोसॉफ्ट ने बनवलेलं आहे. पण सत्य तर हे आहे की मायक्रोसॉफ्ट ने हा GUI चक्क अॅप्पलमधून कॉपी केलेला आहे.

आयपॉड आणि मोबाईल क्रांती


iPods

सोनीच्या वॉकमनचा सुधारित आवृत्ती म्हणजेच आयपॉड होय. 2001 ला स्टिव्ह जॉब्स याने अॅप्पल आयपॉड लॉन्च केला. लोकांना आयपॉड खूप आवडला. लोक तासान तास लाईन मध्ये थांबून त्याची खरेदी केली. आयपॉड ने विक्री चे सर्व रेकॉर्ड मोडून काढत इतिहासच रचला. वापरायला अतीशय सोप्पा, प्रचंड गाणी साठवण्याची सोय, आकाराने लहान आणि सुंदर डिजाईन इत्यादी मुळे हा अतिशय प्रसिद्ध झाला होता.

2003 मध्ये स्टिव्ह ने 'आयट्युन्स' नावाचं ओनलाईन मुजिक स्टोर ची घोषणा केली. यात ग्राहकांना 99 सेन्टस च्या मासिक शुल्का भरून. आयट्युन्स वरच्या लाखो गाणे ऐकता किंवा डाउनलोड करता येऊ शकते. याला देखील लोकांनी डोक्यावर घेतलं आणि अॅप्पल कंपनी प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसली.

पाहिले आयफोन

2007 मध्ये अॅप्पल ने मोबाईल क्षेत्रात पाय ठेवले. त्यांनी आयफोन बाजारात आणला. आयफोन च्या अगोदर नोकिया, ब्लॅकबेरी सारखे कीबोर्ड किंवा बटन वाल्या फोन चा जमाना होता. आयफोन आले आणि लोकांमध्ये टच-स्क्रीन फोन प्रसिद्ध झाले. आयफोन मुळेच बाजारात स्मार्टफोन नावाची नवीन संकल्पना अस्तित्वात आली.

आयफोन च्या यशाचं गमक त्याचा ऑपरेटींग सिस्टम मध्ये आहे. ते म्हणजे iOS होय. बाकी कंपनी जसे नोकिया आणि ब्लॅकबेरी सारख्या फोन्सना हे जमत नव्हते. परिणामी या कंपन्या हळू हळू बाजारातून हद्दपार होत गेल्या. आयफोन कितीही सोप्पा आणि चांगला असला तरी तो खूप महाग होता. याचा फायदा घेऊन गूगल ने अँड्रॉइड नावाची ऑपरेटिंग सिस्टम बनवली. आज ती देखील खूप प्रसिद्ध आहे.

मृत्यू

स्टीव्ह जॉब्सला अन्नाशयाचा कॅन्सर होता. तो खूप वर्षा पासून कॅन्सर ला झुंज देत होता. शेवटी आजार बळावला आणि वयाचा 56 वर्षी 5 ऑक्टोबर 2011 रोजी स्टीव्ह जॉब्स ची प्राण ज्योत मावळली. पण जाता जाता त्याने त्याचा अविष्कारानी जग आणखी सुंदर बनवलं होत हे नक्की.

संदर्भ:-

  •  हे पुस्तक स्टीव्ह जॉब्स ने मृत्यू पूर्वी व्हॉल्टर आईझक्सन या प्रसिद्ध लेखकाला लिहायला सांगितली होती
  • हे पुस्तक स्टीव्ह जॉब्स यांचे अधिकृत जीवन चरित्र असून यात स्टीव्ह जॉब्स बद्दल खूप सकोल माहीती दिली गेली आहे.
  • यात स्टीव्ह जॉब्स चे काही महत्त्वाचे प्रसंग त्या वेळच्या दुर्मिळ छायाचित्रा सोबत प्रकाशित केली आहे. जर तुम्ही स्टीव्ह जॉब्स यांचे फॅन असाल तर हे पुस्तक तुमच्या कडे नक्की असायला हवे.

  • हा लेख लिहण्यासाठी मला बोर्डरूम या पुस्तकापासून खूप मदत झाली यात स्टीव्ह बद्दल थोडक्यात पण सुरेख अशी माहिती दिली गेली आहे.
  • बोर्डरूम हे पुस्तक यशस्वी उदयोग आणि उदयोगपती कसे घडले यांची सखोल इतिहास दिलेला आहे. यात जवळपास 50 ते साठ वेगवेगळ्या उदयोगपती आणि त्याची थक्क करणारी यशोगाथा दिलेली आहे.
  • जर तुम्ही management student , कसलेही व्यापारी किंवा तुम्हाला उदयोग धंद्यात कसलेही इंटरेस्ट असेल तर हे पुस्तक तुमच्या कडे असायलाच हवे. माझा कडे हा पुस्तक आहे आणि मला यातूनच खूप प्रेरणा मिळाली.



  • अच्युत गोडबोले नी त्यांचा खास शैली मध्ये स्टीव्ह जॉब्स बद्दल दिलेली माहिती या पुस्तक तुम्हाला मिळेल.
  • हे पुस्तक खूपच कमी किमतीची आहे जर तुम्हाला स्टीव्ह जॉब्स बद्दल ची अधिकृत पुस्तक महाग वाटत असेल तर तुम्ही या पुस्तकाचा विचार नक्की करावा असे मला वाटते.

मित्रानो मराठीत एक म्हण आहे वाचाल तर वाचाल. या उद्देशानेच मी या लेखाचा शेवटी या पुस्तकांची यादी दिली आहे. आणि हो शेवटी लेख कसा वाटला हे कळवायला विसरू नका. धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या