Strategy आणि Innovation ची रोमांचक गोष्ट
बिझनेस हा कोणत्याही युद्धासारखा किंवा चित्तथरारक सामन्यासारखा असतो. यामध्ये शत्रु असतात, हल्ले असतात, एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी रंजक डावपेच असतात. म्हणूनच मला नेहमीच "बिझनेस्य कथा रम्यः" वाटत आलं आहे.
एका लहान उद्योगाने, बलाढ्य स्पर्धकांवर कशी मात केली त्याची रंजक कथा !
मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशीच रंजक "बिझनेस स्ट्रॅटेजी"ची गोष्ट सांगणार आहे. १९७० सालची ही गोष्ट आहे. मिनेटोंका कॉर्पोरेशन या कंपनीने प्रथमच Liquid Soap Dispenser बनवला होता. Liquid Soap चा शोध तसा ६०-७० वर्षे आधीच लागला होता. पण घरघुती वापरासाठी मात्र Liquid Soap वापरला जात नव्हता.
मिनेटोंका कंपनीने याच Liquid Soap ला एका प्लास्टीक पंप ( plastic Pump) मध्ये भरुन Liquid Soap Dispenser बनवला. या नव्या उत्पादनाची चाचणी केली तेव्हा ग्राहकांना Liquid Soap Dispenser खुपच आवडला. कंपनीच्या लक्षात आले की त्यांचे उत्पादन मार्केटमध्ये चांगलेच चालणार आहे. मात्र हे उत्पादन बाजारात आणण्याची मात्र मिनेटोंका कॉर्पोरेशनला भीती वाटत होती.
याला कारणही तसेच होते. यापुर्वी मिनेटोंकाने ""फळांचा फ्लेवर असलेला शॅम्पु"" बाजारात आणला होता. हा शॅम्पु चांगला चालतही होता. मात्र जेव्हा प्रॉक्टर अँड गॅम्बल ( Proctor & Gamble (P&G)) या कंपनीच्या शँम्पुला हा धोका वाटू लागला तेव्हा P&G कंपनीने स्वतःच्या ब्रँडचा ""Fruit Flavour Shampoo"" बाजारात आणला आणि तो स्वस्त किमतीत विकून मिनेटोंका कॉर्पोरेशनला शर्यतीतून बाहेर ढकलून दिले.
आता या Liquid Soap Dispenser च्या बाबतीत देखिल असेच होण्याची शक्यता होती. कारण प्रॉक्टर अँड गॅम्बल, कोलगेट, लीव्हर्स या बड्या कंपन्या साबण उद्योगात होत्या आणि त्यांना स्वतःचा Liquid Soap Dispenser बाजारात आणायला जराही वेळ लागला नसता. शिवाय Liquid Soap Dispenser मध्ये पेटंट घेता येणही शक्य नव्हतं. कारण Liquid Soap आधीपासूनच बाजरात होता आणि प्लास्टीक पंप औषधे व केमीकल्स साठी आधीपासूनच वापरात होता. त्यामुळे मिनिटोंकाची कल्पनाजरी नवी असली तरी तिचे पेटंट घेता येणे शक्य नव्हते.
मागच्या वेळी झालेली चुक मिनेटोंकाला पुन्हा करायची नव्हती म्हणून आपल्या Liquid Soap Dispenser ला बाजारातील स्पर्धकांपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी मिनेटोंका कॉर्पोरेशन विचार करत होती. तेव्हा कंपनीच्या मॅनेजमेंटला एक गोष्ट लक्षात आली की असे प्लास्टीक पंप बनवण्याचे पेटंट केवळ दोनच कंपन्याकडे होते. त्यामुळे इतर कोणीही या व्यवसायात लगेचच येणे शक्य नव्हते. या माहितीच्या आधारे, मिनेटोंकाने एक अतिशय जोखमीची खेळी खेळली.
प्लास्टीक पंप बनवणार्या या दोनीही कंपन्यांना मिनेटोंकाने "पंप पुरवण्यासाठी' एक भली मोठी ऑर्डर दिली. इतकी मोठी की पुढील दोन वर्षे, दिवसाचे २४ तास जरी या कंपन्या चालू राहिल्या तरीही पुर्ण होणार नाही एवढी मोठी ऑर्डर मिनेटोंकाने दिली. अर्थातच आपले उत्पादन बाजारात भरपुर चालेल याचा मिनेटोंकाला प्रचंड विश्वास होता.
SoftSoap या नावाने मिनेटोंकाने हे उत्पादन बाजारात आणले. अपेक्षेप्रमाणेच SoftSoap हे उत्पादन लोकांना खुपच आवडले आणि SoftSoap या नविन ब्रँडचा उदय झाला. "प्लास्टीक पंप" उपलब्ध नसल्याने पुढे इतर स्पर्धकांना बाजारात उतरण्याचा वावच मिळाला नाही आणि तेवढ्या वेळात SoftSoap ने मार्केट काबिज केले.
त्यानंतर Liquid Soap Dispenser च्या बाजारामध्ये जम बसवण्यासाठी कोलगेट-पाल्मोलीव्ह या कंपनीला SoftSoap हा ब्रँड ६१ मिलीयन डॉलर्सला विकत घ्यावा लागला.
एका लहानशा कंपनीने बलाढ्य अशा स्पर्धकांवर युक्तीने मात केल्याचे हे उद्योगक्षेत्रातील एक जबरदस्त उदाहरण आहे. Strategy आणि Innovation या दोनही बाबींचा संगम असलेली ही गोष्ट उद्योजकांनी/व्यावसायीकांनी नीट अभ्यासली पाहिजे.
किंमती कमी करून कधीही कोणताही उद्योग मोठा होत नाही. उद्योग वाढवायचा असेल, मोठा करायचा असेल, स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर Strategy आणि Innovation ही दोनच आयुधं उपयोगी ठरतात. बाकी सर्व गोष्टी नाममात्र. तेव्हा उद्योजक म्हणून किंवा उद्योग प्रमुख म्हणून या दोन गोष्टींवर तुमचा जास्तीत जास्त भर असला पाहिजे, इतर सर्व कामांमध्ये तुम्ही घालवत असलेला वेळ वाया जातोय असं समजायला हरकत नाही.
लेखक:- unknown
Whatsapp वर आलेला एक अप्रतिम लेख.
3 टिप्पण्या
nice
उत्तर द्याहटवासर्वच लेख संग्रह खूपच अप्रतिमच..!!
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद, या संग्रहात आणखी भर घालू आम्ही
उत्तर द्याहटवा