एक किलो लोणी - आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला आयुष्यात परत मिळतं.


बोधकथा - एक किलो लोणी

एक शेतकरी एका बेकरिवाल्याला रोज एक किलो लोणी विकत असे. एकदा बेकरिवल्याने लोण्याचं वजन करून बघितलं. लोणी कमी भरलं. संतापून त्यानं शेतकऱ्याला कोर्टात खेचलं.

कोर्टात न्यायाधीशांनी शेतकऱ्याला विचारलं, "तू लोण्याचं वजन कसं करतोस?"

शेतकऱ्याने उत्तर दिले, "साहेब, मी तर अडाणी आहे, माझ्याजवळ

मोजायला योग्य माप नाही, पण माझ्याकडे एक तराजू आहे."

यावर न्यायाधीशांनी विचारले, "मग तू लोण्याचं वजन कसं करतोस?"

शेतकऱ्याने उत्तर दिले, "साहेब, या बेकरिवल्याकडून मी एक किलो पाव विकत घेतो. मी तो पाव तराजूत ठेवतो आणि तेवढ्याच वजनाचं लोणी देतो. यात कोणाचा दोष असेल तर तो बेकरिवल्याचा."

या गोष्टी वरून काय बोध घ्यायचा? आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला आयुष्यात परत मिळतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या