June 8, 2023
पियाँटिक ह्या जनरल मोटर्स च्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली.

 

‘माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही’

 

जनरल मोटर्स ने साहजिकच ह्या तक्रारीकड़े दुर्लक्ष केले.

 

काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तिने हीच तक्रार केली.

 

ह्या वेळी जनरल मोटर्स ने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्ति ला त्याची तक्रार व्यवस्थित सांगणयास सांगितले.

 

व्यक्ति ने उत्तर दिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हेनीला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाड़ी सुरु होत नाही.

जनरल मोटर्स ने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यानीसुद्धा त्या व्यक्तिची चेष्टा केली.

काही दिवसांनी त्या व्यक्ति ने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्स पुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

 

त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्ति कड़े पाठवला. इंजीनिअरने गाड़ी चेक केली. सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ति सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला.

 

आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तिने व्हेनीला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तिने सांगितल्या प्रमाणे गाड़ी सुरुच झाली नाही.

 

इंजीनिअरने परत गाड़ी चेक केली पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तिने सांगितलेली तक्रार खरी आहे.

कंपनीने इंजीनियर ला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्ति बरोबर आईसक्रीम खायला गेल्यावर काही दिवसानंतर इंजीनिअर च्या लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो.

पण व्हेनीला फ्लेवर ला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो. आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअर ला पाहिजे होती.

त्याने त्या गोष्टिवर खुप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यन्त गाडीचे इंजिन थोड़े गार होते. आणि गाड़ी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ति जेव्हा व्हेनीला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो.

त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हेपरेशन होते आणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही.

आणि मग गाडीच्या इंजिन ला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सेडीज़ ने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैक च्या मदतीने 1901 साली आपल्या ‘मर्सेडीज़ 35’ साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे.

एकाधी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *