ध्येयावर लक्ष – इतरत्र नव्हे तर ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.

0
776
ध्येयावर लक्ष

ध्येयावर लक्ष – इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.

जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो, कारण आपले फक्त ध्येयावर लक्ष असते. खाली दिलेल्या बोधकथेतून हीच गोष्ट खूप सुंदर रित्या सांगितली आहे वाचा आणि शेयर करा..

एक मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला, “मॅडम, आता मी शाळेत येणार नाही.”
प्रिन्सिपलने विचारले “पण का?”

मुलगा म्हणाला ” मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले ; आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत ; कर्मचारी चांगले नाहीत ; विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक चुकीच्या गोष्टी होतात ….

प्रिन्सिपल ने उत्तर दिले “ओके. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो ते काम कर. एका काचेच्या प्यालात पाणी घ्यायचं आणि एकही थेंब न सांडता शाळेभोवती तीन वेळा चक्कर मार व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड ”

मुलाने विचार केला: हे खूप सोपे काम आहे! प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले

प्रिन्सिपलने विचारले “जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसर्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का?

” त्या तरुणाने उत्तर दिले, “नाही.”

” सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का?”

“नाही”

“शिक्षक शिकवताना पाहिले का?”

“नाही”

तेव्हा प्रिंसिपल त्याला म्हणाले की

“तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास . आपल्या आयुष्याचेही असेच आहे .जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो ”

मतितार्थ….. ध्येयावर लक्ष

इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या …..

Be Positive & remains always in positive mind peoples for success.

हा सुंदर लेख आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here