बोथकथा बांबूची गोष्ट - बांबूच्या झाडाची प्रेरणादाई गोष्ट नक्की वाचाच

बोधकथा


बांबूची गोष्ट

एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालत होता.


दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोम्बामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबत काही फराक दिसत नव्हता.


तो माणूस आता विचार करू लागला होता कि हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोम्बाकडे गेला, पहातो तर काय, त्या कोंबला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबणे अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.


असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेंव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला तेंव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेंव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेंव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले.


तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येवून कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोम्बाप्रमाणे करावा. जेंव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते तेंव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.


ही बांबूची गोष्ट वाचून काय तात्पर्य घ्याल



इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही.
बौद्धीक आणि शारीरीक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.


लेख आवडला असेल तर शेर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या