पॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक

पॉज़िटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक



एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते.
अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ....

● या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढुन टाकलं
आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं .
● याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पुर्ण केली
आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली

● याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं दु:ख मला पचवावं लागलं

● याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला.... त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे ! जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले
शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..!
आणि शेवटी त्यांनी लिहिले ..….

"खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!! इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. भरलेले डोळे आणि विचारात गढुन गेलेल्या आपल्या पतिकडे पहाताच त्याना काहितरी वेगळ असल्याचा अंदाज आला.
सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला आणि काही न बोलता त्या खोलीतुन निघुन गेल्या. थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता.

तो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला. लेखक महाशयानी तो कागद उचलुन वाचायला सुरुवात केली.

त्यात लिहिले होते ..

● गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढुन टाकले. आता मला कुठलाही त्रास नाही. मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!

● याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली. आणि एक चांगल्या नोकरीतुन सन्मानाने सेवानिवृत्त झालो, आता अजुन चांगलं आणि लक्षपुर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!

● याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबुन न रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले ..!!

● याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!
आभारी आहे देवा ...!!
किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तु मला ..!!"

बघा मित्रानो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!! नकारात्मक विचार बाजुला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !!

आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात. आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो.
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..!!!
त्या घटनेची वाईट बाजु न पहाता चांगली बाजु, सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला शिका.
जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा ...!!
जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!
Every Dark cloud has a silver lining …!!!
प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!!
शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे.

आपल्याकड काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!
दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!

शेवटी पाडगावकरांच्या ओळी आठवतात….!!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!
सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत
कि गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा....!!
मित्रानो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा ..!!

like our facebook page Marathi Motivation for more wonderfull articles.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या