June 8, 2023

एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा

शिकार कि शिकारी

…………………………………

कोलकात्याची मोठी आणि नामवंत सर्कस..
दीड -दोनशे कलावंत आणि पन्नासेक जनावरं..
पन्नास जनावरांमध्ये दहा वाघ..

लहानपणापासून सर्कशीत वाढलेली ..
कालांतराने सर्कस चालेनासी झाली..

कलावंतांना आणि जनावरांना पोसणे सर्कशीच्या मालकाला अशक्यप्राय बनले..
शेवटी दहाही वाघांना बंगालच्या जंगलात नेऊन सोडण्याचे ठरले.

ठरल्याप्रमाणे दहाही वाघांना पिंज-यांत कोंडून ते पिंजरे ट्रकमध्ये ठेवून वाघांना जंगलात सोडण्यात आले..

आठव्या दिवशी समजले की दहापैकी सात वाघांची जंगली कुत्र्यांनी शिकार करुन त्यांना ठार मारले आहे..

जन्मभर सर्कशीत राहिलेल्या वाघांना पिंज-यात रोज आयते मुर्दाड मांस मिळत गेल्याने ते शिकार करायचे पार विसरुन गेलेले..

याऊलट जंगलात जन्मलेल्या कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे समजल्यामुळे ते उत्कृष्ट शिकारी बनले आणि त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वाघांचीही शिकार केली.

आपलंही असंच आहे..

स्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वणवण फिरत रहायचं..

माझ्या मुलांना मी बंगला बांधणार,
जमीन जायदाद घेणार, धन दौलत, पैसा अडका सारं सारं जमवून ठेवणार…
माझ्या माघारी माझ्या मुलांना कशाचीही कमतरता भासली नाही पाहिजे.
मुलं आयुष्यभर आनंदात जगली पाहिजेत म्हणून किती हा आटापिटा??

खरे तर आपण आपल्या मुलांना सारं सारं आयतं देऊन त्यांना करण्यासाठी काही कामच ठेवत नाही..
म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सर्कशीतले वाघच बनवत नाही का??

या उलट ज्यांच्या घरी तीन वेळेच्या जेवणाची मारामार असते अशी गरीब आणि सर्वसाधारण घरची मुले स्वबळावर शिकतात ,
टिकतात आणि संसार उभा करतात..

ज्या प्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकारीशिवाय आपण जगूच शकत नाही याची खात्री पटते आणि तो तरबेज शिकारी बनतो
अगदी त्याच प्रमाणे सर्व साधारण घरची मुलेही
“जे करायचं ते मलाच”
असे म्हणून तन मन धन ओतून अपार कष्ट करुन स्वतःचे आयुष्य घडवतात.

आयतोबा मात्र कधी ना कधी कोणाची तरी शिकार बनतात..

संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा…

आपणच ठरवा , आपण आपल्या मुलांना शिकारी बनवायचे की शिकार बनवायचे…??

शेर करा कारण चांगला संदेश चांगल्या लोकांपर्यंत पोहचायलाच हवा …!
बरोबर ना..?

अश्या सुंदर बोधकथा आम्ही दररोज आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन वर टाकत असतो त्याला जरूर लाईक करा धन्यवाद.

2 thoughts on “शिकार कि शिकारी – एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा

  1. हा लेख मला अजिबात पटला नाही वहाग घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा टायगर कधी शिकार करायची विसरत नाही

  2. खूपच छान आहे आणि विचार करायला लावणारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *