June 8, 2023
एकाग्रता

एकाग्रता (Focus)

मित्रांनो जपान मध्ये एक सुपर कॉम्प्युटर बनवण्यात आला. ज्यात 7,05,024 एवढे प्रोसेसर आणि 14,00,000 GB एवढा रॅम होता. या कॉम्पुटर ला मानवाचा मेंदूच्या 1 सेकंड्स चे काम करायला तब्बल 40 मिनिट लागले. आता विचार करा आपला मेंदू किती शक्तीशाली असेल. या शक्तीशाली मेंदूनी आपण काहीही करू शकतो पण सर्वकाही करू शकत नाही. हो सुपरकॉम्पुटर पेक्षा वेगवान अश्या आपल्या मेंदूला एक खूप मोठी मर्यादा आहे. ती म्हणजे हा ऐका वेळी एकच काम करू शकतो. पण हे आजकाल कोणाला कळतच नाहीये.

आजकालची पिढी ही मोबाईल सारखंच मल्टी टास्किंग होऊ पाहत आहे. गाणे ऐकत पुस्तक वाचणे, टीव्ही बघत जेवणे अशे प्रकार सर्रास लोक करताना दिसतात. याने आपण आपल्या सुपरफास्ट मेंदू ला सुपर स्लो करतोय एवढं नक्की. परिणामी कोणतेही काम किंवा अभ्यास करायची इच्छा असून देखील आपण लवकर कंटाळतो किंवा तुमच्या भाषेत बोर होतो. हे सगळे एकाग्रतेच्या अभावामुळे होते. तर आज आपण एकाग्रता कशी वाढवता येईल हे बघू.

 

एकाग्रता व्यख्या आणि महत्व:

तुम्हाला एकाग्रता म्हणजे काय माहिती असेलच तरीही, हा पूर्ण लेख समजण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एकाग्रता म्हणजे नेमके काय हे समजणे आवश्यक आहे. तर एकाग्रता म्हणजे एखादं काम करते वेळी दुसरे कोणते काम न करणे किंवा दुसऱ्या कोणत्या कामाचा विचार न करणे होय.

आजकाल च्या जीवनात खूप जास्ती अडथळे आहेत. त्यात मुख्य म्हणजे स्मार्टफोन आणि social Media होय. जेंव्हा कधी तुम्ही एकाग्र होण्याचा प्रयत्न करता तेंव्हा व्हाट्सअप चा एकदा मेसेज येतो आणि त्यात आपण एखादा तास रमतो. परत एकाग्र होऊच शकत नाही. जवळपास 80 टक्के तरुण पिढी या गोष्टीपासून त्रस्त असेल.

आजकालच्या या अडथळ्या नी (distractions) जसे व्हाट्सअप, फेसबुक, स्मार्टफोन इत्यादी नी भरलेल्या जीवनात एकाग्रता (focus) ही एक कौशल्य (skill) बनली आहे. या skill चा उपयोग करून जो कोणी काम करतो तो इतरांपेक्षा लवकर आणि उत्तम काम करतो आणि यशस्वी होतो.

एकाग्रता वाढविण्यासाठी चे काही उपाय

1) लहान सुरुवात करा.

 

जर एखाद्याने भाऊबली चित्रपट पाहून, सिक्स पॅक बनवायचे ठरवले आणि पहिल्या दिवशी जिम मध्ये जाऊन, जिम ट्रेनर ला म्हणाला की मला आजच्या आज सिक्स पॅक बनवायचे आहेत, तर हे शक्य आहे का. जिम ट्रेनर त्याला पहिल्या दिवशी लहान सहान व्यायाम करायला लावेल, कारण आणखी त्याचे शरीर मोठे व्यायाम करण्यास सर्मथ नसेल. तसेच आपल्या मेंदूचं देखील आहे. तुम्हाला लहान गोष्टी एकाग्र होऊन करावं लागतिल.
जसे 5 मिनिटे एकाग्र होऊन आभास किंवा कोणतेही काम करा. सुरुवातीला 5 मिनिटं देखील तुम्ही एकाग्र होऊ शकणार नाही, पण दररोज च्या 5 5 मिनिटांच्या सरावा नंतर तुम्ही आरामात ते साध्य करू शकता. त्यानंतर हा वेळ 10 मिनिट, मग नंतर 15 असे करून वाढवू शकता. याने तुमची एकाग्रता वाढण्यासाठी खूपच मदत होईल.

 

2) संयम आणि इच्छाशक्ती

काही शाळकरी मुलांवर एक प्रयोग करण्यात आला. त्यात त्यांचा वर्गात त्यांचे आवडते चॉकलेट ठेवण्यात आले, आणि मुलांना सांगण्यात आले की वर्ग शिक्षक येई पर्यंत जो कोणी चॉकलेट खाणार नाही त्याला दोन चॉकलेट देण्यात येईल. या प्रयोगात दर 3 मधून 2 मुलांनी शिक्षक येण्याअगोदर च चॉकलेट खाल्ले. 3 पैकी एकाच मुलाला दोन चॉकलेट मिळले. या प्रयोगाचा खरा निष्कर्ष हा 15 वर्षा नंतर समोर आला तो असा होता. ज्या एक विद्यार्था ने ते चॉकलेट खाल्ले नव्हते तो इतर दोन मुलांपेक्षा आयुष्यात यशस्वी ठरला.

आता यात चॉकलेट म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी, कामापासून किंवा अभ्यासा पासून दूर घेऊन जाती ती गोष्ट होय. जसे व्हाट्सअप्प स्मार्टफोन इत्यादी. आणि तुम्ही म्हणजे विध्यार्थी होय. आता तुमच्या मधील इच्छाशक्ती किंवा संयमच तुम्हाला ते चॉकलेट खण्यासपासून वाचवू शकते. इच्छाशक्ती देखील एकदम येणारी गोष्ट नाही त्याला देखील हळू हळू वाढवावे लागेल. तुमच्या मधला संयम आणि इछाशक्ती हे एकाग्रता वाढवण्याची खूप गरजेचं आहे.

3) नियंत्रण

तुम्हाला जर यशस्वी बनायचं असेल तर, तुमचा तुमच्या मनावर आणि तुमच्या सर्व इंद्रियांवर ताबा असले आवश्यक असते. लक्षात ठेवा मेंदू आणि शरीर यांचा उपयोग करून, आपले ध्येय, स्वप्न पूर्ती साध्य करायची असते. जर तुम्ही स्वतः ला नियंत्रित करू शकत नाही तर तुम्ही काहीच करू शकणार नाही.

आपण रागात किंवा इतर भावनेत आपल्या वरचा ताबा सोडून देतो. परिणामी दुःखशिवाय काहीच हाती लागत नाही. या उलट आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या वरचा ताबा जाऊ दायचं नसतो. आपले सगळे इंद्रिय आपल्या ताब्यात हवेत, आपण इंद्रियांच्या ताब्यात नकोत. एकाग्रता वाढवण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे.

4) एकाग्रता वाढवण्यासाठी योग

आपल्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य देणगी म्हणजे योग होय. तसे तर योगाचे हजरो फायदे आहेत पण त्याचा आणखी एक फायदा हा आहे कि याने आपले आपली एकाग्रता आणि एखाद्या गोष्टीला समझुन घेण्याची सक्ती खूप वाढते. नेमके होते काय तर योग करत असताना आपण आपले पूर्ण लक्ष हे आपल्या श्वासांवर घेऊन जातो. याने आपल्या मेंदूचा एखाद्या गोष्टीवर एकाग्र होण्याचा जणू व्यायाम होतो.

योग तुमच्या मेंदूला रिलॅक्स करेल ज्याने तुमच्या भावणा तुमच्या ताब्यात राहतील याने तुमचे शरीर तुमच्या नियंत्रणात राहील व तुम्ही तुमच्या मनाला देखील कण्ट्रोल करू शकाल आणि चांगले एकाग्र होऊन आभास इत्यादी करू शकाल. तुम्ही जेवढे स्वतःला स्वतःचा ताब्यात ठेवाल तेवढं आयुष्यात यशस्वी व्हाल.

शेवटी कसा वाटला हा लेख कॉमेंट करून प्रतिक्रिया कळवा आणि आमचे फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करायला विसरू नका.

referance.

 

1 thought on “एकाग्रता (focus) वाढविण्याचे 4 उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *