स्टिव्ह जॉब्स
स्टिव्ह जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःलाे वाहून घेतले होते. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. आज आपण स्टिव्ह जॉब्स याचे काही सिक्रेट नियम पाहणार आहोत. जे नियम वापरून स्टिव्ह जॉब्स घडला. तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे नियम खूप कामी येतील.1) तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.(Do what you love to do.)
स्टिव्ह जॉब्स म्हणतो
"Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do."
मित्रांनो तुम्ही आज कुठले ही क्षेत्र घ्या, वरवर पाहता ते खूप सोप्पे वाटते. पण जसे जसे तुम्ही त्यात डीप मध्ये जाता तेंव्हा तुम्हाला कळते की त्या कामात खूप अडचणी आहेत. त्यात देखील खूप कौशल्य लागतात.अश्या वेळी जर तुम्हाला तुमच्या कामाचा प्रती उत्कटता नसेल, प्रेम नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी ना तोंड देऊच शकणार नाही.
म्हणूनच अडचणी च्या वेळी तुमचं त्या कामाच्या प्रति किती आवड आहे हेच ठरवते की तुम्ही त्या क्षेत्रात रहाणार कि नाही. थोडक्यात जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल. तर तेच करा जे तुम्हाला करायला आवडते.
2)वेगळे विचार करा (think different)
स्टिव्ह म्हणतो
बराच वेळा आपण ते करतो जे सर्व लोक करत आहेत. आपण मळलेल्या वाटांवरच चालणे जास्ती पसंद करतो. कारण नव्या वेगळ्या वाट शोधणे आणि त्या वर चालणे आपल्याला असुरक्षित वाटते किंवा आपण भितो नवीण वाटेवर चालायला.Better Be a pirate than to join navy. Be different
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जर ते मिळवायचे असेल जे कोणी आज पर्यंत मिळवले नसेल तर तुम्हाला हि ते करावं लागेल जे आज पर्यंत कोणी कधी केली नसेल. ईतर लोकांनी जे केलं, जी वाट शोधली त्याच वाटेवर तुम्ही गेलात तर तुम्ही देखील तिकडेच जाल जिकडे ते गेले. त्यात नाविन्य ते काय. म्हणून
Be Different, think different.
स्टिव्ह जॉब्स कॉम्प्युटर बनवायचा, मोबाईल इत्यादी अनेक गोष्टी तो हयातीत असताना अप्पल ने बनवले. या सर्व गोष्टी काय नवीन होत्या? अजिबात नाही, पण आपण बघतो अप्पल आणि बाकी कंपनीन मधील फरक. येथे वेगळा विचार म्हणजे नाविनच काही तरी केले पाहिजे असा होत नाही तर सगळे जे करतात त्याचा पेक्षा आपण वेगळे करायला पाहिजे. लक्षात ठेवा "विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात."
3) पहिले पाऊल टाका (the first step is hardest one, just take it)
एक व्यक्ती ने त्याचा देशाचे संपूर्ण भ्रमण केले होते ते देखील सायकल चालवत. या त्याचा पराक्रमा नंतर पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली. त्या मुलाखती मध्ये त्यांनी त्या व्यक्तीला विचारले की तुम्हाला या प्रवासात सर्वात जास्ती कोणती गोष्ट अवघड वाटली. त्या वर त्या व्यक्तीचे उत्तर होते की घरचा उंबरटा ओलांडणे सर्वात आवघड वाटले. एखाद्या कामाची सुरुवात करणे हेच सर्वात महत्त्वाचे आणि अवघड काम असते.या वर स्टिव्ह म्हणतो.
Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition.
पहिले पाऊल टाकणे हेच कधी कधी सर्वात अवघड काम बनते, तेव्हा ते पाऊल टाका आणि अंतर्मनचे ऐका, ध्येर्य बाळगा. जेंव्हा तुम्ही पहिले पाऊल टाकता तेंव्हा तुम्हांला दुसरे पाऊल कुठे टाकायचे हे तुम्हांला लक्षात येईल.
4) सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा (start small, think big)
स्टिव्ह जॉब्स आणि त्याचा मित्र स्टिव्ह वॉझनिएक या दोघांनी अप्पल कंपनी ची स्थापना एका ग्यारेज मध्ये केली होती. त्यां दोघांना त्यांचा पहिला कॉम्प्युटर 'अप्पल-1' बनवण्या साठी 1000 डॉलर्स ची गरज होती ती त्या दोघांनी त्यांचा आवडत्या गोष्टी विकून मिळवल्या होत्या. आज तुम्हाला सांगायची गरज नाही की अप्पल कंपनी कुठे बाकी कंपनी च्या तुलनेत.म्हणून स्टिव्ह म्हणतो
Don't worry about too many things at once, just concentrate on one thing, start small , think bigएका वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा.
5) नेहमी शिकत राहा (Learn continually.)
मित्रांनो तुम्हाला वॉरेन बफे तर माहिती असतीलच, त्यांना शेर मार्केट मध्ये गुरूंचे गुरुं मानले जाते. ते दिवसात 600 ते 1000 पेज वाचन करतात. ते जवळपास त्यांचा 80% दिवसाचा वेळ हे वाचनात घालवतात. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा यादीत 2 किंवा 3 सातत्याने येतात. अश्या माणसाला देखील नाविन शिकण्याची आवश्यकता वाटते. तर तुम्हाला आणि मला आणखी किती शिकायचे आहे विचार करा.यासाठी स्टिव्ह जॉब्स देखील म्हणतो
Learn continually. There's always one more things to Learn.निरंतर शिकत राहा. कितीही शिकले तरी आणखी एखादी गोष्ट शिकण्या साठी नक्की असते. जगातील सर्व यशस्वी लोकांना घ्या. ते त्यांचा वेळ हे नाविन काही तरी शिकण्यात ते जास्ती खर्च करत असतात.
6) फक्त पैशांसाठी नका करू(Don't do it for money)
हा नियम माझा खूप आवडीचा नियम आहे. कुठलीही गोष्ट फक्त पैसे कमावणे एवढंच उद्दिष्ट समोर ठेवून बनवण्यात अली असेल, ती गोष्ट फार काळ टिकू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमचे ध्येय ठेवताना फक्त पैसे कमावणे एवढेच नका ठेवू. या गोष्टीला प्रमाण म्हणून तुम्ही कोणती ही मोठी कंपनी घ्या त्या कंपनी चे ध्येय हे पैसे कमावण्याचा वर आहे.
या साठी अप्पल कंपणीचेच ऊदाहरण घ्या. अप्पल मध्ये बनवले गेलेले सर्व प्रॉडक्ट्स नी जगात क्रांती आणली. जसे अप्पल कॉम्प्युटर पर्सनल कॉम्प्युटर विश्वात क्रांती आणली आणि i-phone आले आणि मोबाईल विश्वात क्रांती अली. इत्यादी.
या साठी स्टिव्ह जॉब्स म्हणतो.
Don't do it for the money. Choose a job you love., And you will never have to work a day in your life.म्हणजेच पैसा साठी काम नका करू. फक्त आवडीचे काम शोधा आणि तुम्हाला आयुष्यात कधी काम करायची गरज पडणार नाही. स्टिव्ह जॉब्स 25 वर्षाचा होता तेंव्हा त्याचा कडे 100 मिलीयन डॉलर्स एवढी संपत्ती होती. पण त्याने कुठलीही गोष्ट फक्त पैसे कमवण्या साठी केलं नव्हतं, त्याला आपल्या अविष्काराणी जग बदलायचं होत.
7) भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका (Don't let the noise of other's opinion drown out your own inner voice.)
जगात सर्वात मोठी गोष्ट जी माणसाला यशा पासून दूर ठेवते ती म्हणजे लोक काय म्हणतील. आपण बऱ्याच वेळा एखादे काम, लोक काय म्हणतील हाच विचार करून करत नाही. लोक आपल्या प्रति काय विचार करतात हे तुम्हाला विचार करायची काहीच गरज नसते. लोकांचा या भाऊ गर्दीत तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज हरवू नका देऊ.
नेहमी मनातले करा, ज्यात तुमची आवड असेल ते करा. अगदी मन मोकळे बिंदास कोणाची तमा न बाळगता. आणि लोकांन साठी हे हिंदी गाणे म्हणा 'कुछ तो लोग कहेंगे! लोगोका काम हे केहना'.
8) दुसऱ्याचं आयुष्य नका जगू (Don't live someone else's life)
प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, युनिक आहे. प्रत्येकांचा चेहरा वेगळा आहे, रंग वेगळा आहे, आवाज वेगळा आहे. प्रत्येक मनुष्य वेगळा आणि युनिक आहे. मग प्रत्येकला आपले स्वतंत्र विचार असू नये. म्हणून स्वतः विचार करा. थोडा वेळ स्वतः सोबत ही व्यतित करा. जाणून घ्या तुमच्या मधील स्टिव्ह जॉब्स ला.स्टिव्ह म्हणतो.
Your time is limited so don't west it leaving someone else's life.
तुमचा वेळ हा खूप मर्यादित आहे, त्याला दुसऱ्याचा आयुष्या साठी नका खर्च करू. स्वतः साठी खर्च करा. तुमच्या जहाँजाचे तुम्हीच कॅप्टन बना. तुमच्या आयुष्याचं डिजाईन स्वतः तयार करा. तुम्हाला असे करण्या साठी दुसरी संधी अजिबात नाही मिळणार म्हणून एक तरी आता करा किंवा नंतर पश्चाताप करा. निवड तुमची आहे.
9) अनुकरण नका नेतृत्व करा ( innovation distinguishes between a leader and a follow.)
समाजात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे लीडर आणि दुसरे त्यांचे फॉलोअर्स(अनुयायी). लीडरने जे केलं किंवा जे करायला सांगितलं ते करतात ते अनुयायी आणि जे नवीन गोष्टी करतात ते लीडर. जर तुम्ही कोणाचे अनुकरण करत असाल तर तुम्ही देखील एक अनुयायी आहात. म्हणून स्टिव्ह म्हणतो लिडर आणि अनुयायी यात नाविन्य एवढंच फरक असतो. कामात नाविन्य आणले तर तुम्ही लीडर बाकी सर्व तुमचे फॉलोअर्स बनतील. मग आज पासून अनुकरण सोडून नाविन्य शोधायला लागा.10) stay hungry, Stay foolish
स्टिव्ह जॉब्स यांचा खूप च गाजलेला हा विचार आहे.'स्टे हंग्री स्टे फुलीश' म्हणजे. कधीच संतुष्ट नका होऊ खास करून शिकण्याचा बाबतीत. आणि पूर्ण पाणे मूर्ख बना, जे गोष्ट लोक अशक्य असे ठेवतात ती गोष्ट शक्य करण्याची धडपड करणारा मूर्ख बना. असे स्टिव्ह जॉब्स म्हणतो. म्हणून मित्रानो माझा एक शेवटचा सल्लाStay hungry stay foolish
स्टीव्ह जॉब्स बद्दल आणखी वाचण्यासाठी तुम्ही खालील काही पुस्तके खरेदी करून वाचू शकता.Stay hungry Stay foolish
हे पुस्तक माझ्या सर्वात आवडत्या लेखक अच्युत गोडबोले यांचं आहे.तुम्हला हेपुस्तक नक्की आवडेल.
तुम्ही स्टीव्ह जॉब्स चे अधिकृत जीवन चरित्र देखील मराठीत वाचू शकता. त्या पुस्तकाची लिंक देखील खाली देत आहे.
4 टिप्पण्या
where nice
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवाVery nice instructions for successful life !
उत्तर द्याहटवाCan I use it in YouTube videos
उत्तर द्याहटवा