June 8, 2023
आत्मविश्वास सुविचार

आत्मविश्वास सुविचार

छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तो तुम्हाला पावसात देखील पुढे जाण्यासाठी मदत करतो तसेच, आत्मविश्वास देखील तुम्हाला यश मिळवून देत नाही पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो. म्हणूनच आम्ही तुमच्या साठी काही खास आणि निवडक अश्या आत्मविश्वास सुविचार संग्रह आणलेला आहे. जे वाचून तुमचा आत्मविश्वास नक्कीच खूप वाढेल. एकदा नक्की वाचा, सुविचार आवडले तर whatsapp वर मित्रांना शेर करा धन्यवाद.

 

Marathi Suvichar ची यादी

 


 

Suvichar 1:

काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्‍या होतात…

 


 

Suvichar 2:

काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते‌.

 


 

Suvichar 3:

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.‌

 


 

Suvichar 4:

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.‌

 


 

Suvichar 5:

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी हि त्याच्या साठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते.

 


 

सुविचार 6:

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

 


 

सुविचार 7:

गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना.

 


 

सुविचार 8:

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

 


 

सुविचार 9:

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

 


 

सुविचार 10:

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

 


 

सुविचार 11:

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..‌


 

सुविचार 12:

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.


 

सुविचार 13:

जर तुम्ही कोणत्या ध्येयाशिवाय उठणार असाल तर तुम्ही पुन्हा झोपलेलाच बरे‌

 


 

सुविचार 14:

जितके अधिक जगण साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजर करण्यासाठी कारण देईल.‌

 


 

सुविचार 15:

दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.

 


 

सुविचार 16:

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.

 


 

सुविचार 17:

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचायची ऐपत नसते.


 

सुविचार 18:

 

परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.

 


 

सुविचार 19:

प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.

 


 

सुविचार 20:

फक्त परिणामांकडे बघू नका, आपल्याला तेच मिळत ज्याचे आपण लायक आहोत.

 


अश्या अप्रतिम सुविचारांसाठी आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा धन्यवाद. आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा आणि दररोज एक प्रेरणादायी सुविचार चे अपडेट मिळवा.

3 thoughts on “आत्मविश्वास सुविचार – आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *