प्रेरक कथा (inspirational story)
अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण
स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, 'मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.'
काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, 'बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.' तेव्हा कलाम म्हणाले, 'तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.' त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले.
कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले.
ते म्हणाले, 'बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.'
अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत.
0 टिप्पण्या