Suvichar Marathi
suvichar marathi छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तो तुम्हाला पावसात देखील पुढे जाण्यासाठी मदत करतो तसेच, आत्मविश्वास देखील तुम्हाला यश मिळवून देत नाही पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो. म्हणूनच आम्ही तुमच्या साठी काही खास आणि निवडक अश्या सुविचारांचा संग्रह आणलेला आहे. जे वाचून तुमचा आत्मविश्वास नक्कीच खूप वाढेल. एकदा नक्की वाचा, सुविचार आवडले तर whatsapp वर मित्रांना शेर करा धन्यवाद.
फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
मला आता नवीन टिकाकारांची गरज आहे कारण आधीचे टीकाकार माझ्या प्रेमात आहेत.
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
मी अशी फार थोडी महान माणसे पहिली आहेत ज्यांचा भूतकाळ संघर्षमय नव्हता.
मी या जगात साधारण म्हणून जगायला आलेलो नाही.
यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे,
हे मी सांगू शकणार नाही.
पण स्वतःला ओळखून स्वतःला,स्वतःसाठी,स्वतःकङून नेमके काय हवे आहे,हे शोधणे म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय.
यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्या चढाव्या लागतात.
रस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.
रिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते.
विचार हेतूकडे नेतो,हेतू कृतीकडे,कृतीमुळे सवय लागते,सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते.
Suvichar 14:
विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण.
विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.
विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका..
शिस्त म्हणजे तुमचे चांगले चिंतणारा मित्र आहे जरी त्याचे शब्द कितीही कठोर असले तरीही.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.
सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.
सुख बाहेर आहे, आनंद आंत आहे.
Suvichar 23:
स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील.
होकार नाकारायला आणि नकार
स्वीकारायला सिंहाच काळीज लागत.
अश्या अप्रतिम सुविचारांसाठी आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा धन्यवाद. आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा आणि दररोज एक प्रेरणादायी सुविचार चे अपडेट मिळवा.