बोधकथा माणुसकीचे फळ
जरूर वाचाएका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.
कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.
तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते.
त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता.
त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले,
"तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय." सुरक्षा रक्षक म्हणाला, "या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो."
त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.
माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल... म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा...
शेअर नक्की करा :
Follow us on telegram for more article like this
1 टिप्पण्या
kup chan sir
उत्तर द्याहटवा