बोधकथा कारचा दफनविधी | wisdom tales Car Burial Ceremony


थोडं थांबून शांत मनाने वाचावी अशी एक गोष्ट !!
******

ब्राझील देशातील थेन चिकीनो स्कार्पा नावाच्या एका गर्भ श्रीमंत माणसाने एक गोष्ट घोषित केली की, त्याच्या कडे असलेली करोडो डाॅलर किमतीची बेंटली कार तो दफन करणार..!! मृत्युनंतरच्या जिवनात ही ऐशोरामात या कार मधून फिरण्याची त्याची मनिषा पारलौकीक जगातही पूर्ण होत रहावी , हा त्याचा उद्देश असल्या चेही त्याने जाहिर केले.

अर्थातच माध्यमांनी त्याच्या या विचित्र घोषणेला प्रचंड प्रसिद्धी दिली. देशभर चर्चा सुरू झाली. या चर्चेचा सूर नकारात्मक होता. थेन चिकीनो वर प्रचंड टिका करण्यात आली. एवढी किमती कार पुरून टाकणे हा मुर्खपणा असल्याचे लोकांनी म्हटले आपणास ही कार विकायची नव्हती तर दान करून टाकली असती तर पुण्य तरी मिळाले असते असा सल्ला ब्राझिलीयन मेडिया ने दिला...

हे कृत्य म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा विनाश असल्याचेही अनेकांनी म्हटले.. तेथील काही राष्ट्रभक्तांनी त्याला देशद्रोही ही संबोधले.

अखेर सर्व प्रकारच्या टिकेला सामोरे जात थेन चिकीनो ने त्याच्या स्टेनली कारच्या दफन विधी समारंभाची तारीख ही जाहिर करून टाकली.

झाले...अखेर तो दिवस उजाडला. प्रचंड गर्दी जमली. विविध माध्यमांचे अनेक प्रतिनिधी लाईव कवरेज साठी हजर होते..

येथे कहाणीला ट्विस्ट आहे. आणि तसा तो नसता तर हा किस्सा आपणासाठी मी लिहीला ही नसता... आणि जगभरच्या माध्यमांनी त्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी ही दिली नसती...

थेन चिकीनोने घराच्या अंगणातच कार पुरता येईल एवढा मोठा खड्डा खणून घेतला होता... थोड्याच वेळात ही महागडी कार पुरली जाणार होती. तेवढ्यात थेन चिकीनो ने, तो ही कार दफन करू इच्छित नाही अशी घोषणा केली.. आणि हा दफन विधीचा ड्रामा एका अत्यंत आवश्यक अशा राष्ट्रीय कार्यासाठी असल्याचे सांगितले.

ह्या गुपित राष्ट्रीय कार्याची उकल त्याने केली तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला व थेन च्या जय जय काराच्या घोषणा दिल्या. अवयव दानाचे महत्व माझ्या देशातील जनतेला कळावे हाच एकमेव पवित्र उद्देश ह्या दफन नाट्या मागे असल्याचे थेन ने सांगितले.

थेन चिकानो म्हणाला, "लोकांनी मी महागडी / किमती कार दफन करणार म्हणून मला मुर्ख म्हटले. खरी गोष्ट तर ही आहे की ह्या कारपेक्षा ही खूप किमती असलेले अवयव आपण पुरून टाकता. हृदय, यकृत, फुफ्फुसे डोळे, मूत्रपिंडे आदी अवयव पुरून टाकणे हा मी करत असलेल्या मुर्खपणा पेक्षा खूप मोठा मुर्खपणा कळत नकळत आपण सारेच जण पिढ्यान पिढ्या करत आहात..!!

आपल्या देशात हजारो लाखो रूग्ण अवयवांची वाट पहात आहेत. कोणी त्यांना दान दिले तर त्यांना नवा जन्म मिळणार आहे..!! अनेकांचे प्राण यातून वाचू शकतील..!!
आज आपणही अवयव दानाचा संकल्प करूया..!!"

मित्र मैत्रीणीनो, अवयव दानाचा प्रचार व प्रसार करावा व ..ब्रेन डेड परिस्थितीत जरूर निर्णय घेऊन गरजवंतांना अवयव दान करुन मदत करावी . तसेच एक कळकळीची विनंती, हा मेसेज वाचून दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त ग्रुपमध्ये व मित्र-मैत्रिणींना पाठवावा.

टिप्पणी पोस्ट करा

10 टिप्पण्या

  1. खूप खूप धन्यवाद तुमच्या मित्रांना ही कहाणी शेर करा

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद शेर करा जेणेकरून हा संदेश सर्वांपर्यंत पोहचला जाईल

    उत्तर द्याहटवा