June 8, 2023
चित्रामधील चुका

चित्रामधील चुका

चित्रामधील चुका : एका गावामधे चित्रकार होता. तो खूप छान चित्र काढत असे. त्यानं एक मोठं चित्र काढलं. मोठं पोस्टरच होतं ते. त्याने काढलेलं सर्वात सुंदर चित्र होत ते. चित्रकारने ते गावातल्या एका प्रमुख चौकात ठेवलं. तिथं एक सूचना लिहिली, या चित्रात बघणाऱ्याला काही चूक आढळल्यास सोबतच्या वहीत ती लिहावी. त्याला वाटले लोकांना एकही चुक शोधून मिळणार नाही. पण झालं उलटच, पुष्कळ लोक आले. चित्र बघून त्यांनी हवी ती सूचना लिहिली. इतक्या सूचना आल्या कि वही अगदी भरून गेली. एका चित्रात इतक्या चुका, कसं शक्य आहे ते?

तो पुरता गोंधळून गेला. आपली शंका दूर करण्यासाठी तो आपल्या गुरुकडे गेला. झालेला प्रकार त्याने आपल्या गुरुच्या कानी घातला. त्यावर गुरुने सांगितले, आता असे कर, ते चित्र पुुन्हा चौकात ठेव. त्याच्या शेजारी रंग व ब्रश ठेव आणि सूचना लिही की, “ज्याला कोणाला या चित्रात चूक दिसेल, दोष दिसेल त्याने तो ब्रशने दुरुस्त करावा.’ चित्र सुधारण्यासाठी एकही माणूस पुढे आला नाही. ते चित्र आहे तसेच राहिले. आमच्या समाजाला दुसऱ्याच्या चुका तेवढ्या दिसतात. दोष दिसतात पण त्या सुधारण्यासाठी कोणी पुढे येत नाही ही आमच्या समाजाची जी प्रवृत्ती आहे ती बदलली पाहिजे.

बोधकथा – चित्रामधील चुका तात्पर्य : चुका काढणे जितके महत्वाचे तितकेच त्या सुधारणे महत्वाचे असते.

3 thoughts on “बोधकथा – चित्रामधील चुका | Marathi Motivational Story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *