श्रीनिवास रामानुजन
जागतिक दर्जाचे भारतीय गणिती शात्रज्ञ श्रीनिवास रामानुजन.
गणित हा विषय अनेकांना अवघड जातो. त्यामुळे या विषयांत नापास होणा-यांची संख्या मोठीच आहे. मोरोपंत यांच्या अनेक आर्या या गणिती, कूटप्रश्नांनी भरलेल्या असायच्या. गणित हा विषय अधिक सोप्या पद्धतीने शिकवल्यास मुलांना त्याची भीती राहणार नाही. पण आपल्याकडे गणित शिकवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धतच क्लिष्ट असल्याने या विषयाविषयीचे ममत्व वाटण्याऐवजी, भीतीच अनेक मुलांच्या मनात असते. वास्तविक पाहता भारतात रामानुजन सारखे गणिततज्ज्ञ होऊन गेलेले आहेत.
जन्म
श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडू प्रांतातील इरोड या गावी झाला. त्यांच नाव संत रामानुजा यांच्यावरुन ठेवण्यात आल होत. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगार एका कापडाच्या व्यापारीकडे नोकरी करत होते. त्या व्यवसायातील प्राप्ती अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यांनी आपला मुक्काम कुंभकोणम या टुमदार शहरात हलवला आणि एका व्यापार्याकडे मुनिमाची नोकरी करण्यास सुरुवात केली.
शिक्षण
वयाच्या पाचव्या वर्षी रामानुजन यांचे नाव कुंभकोणमच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. गणितावर त्यांचे कल्पनातीत प्रभुत्व होते. ते मनातच गणित करून उत्तर शोधात. कधी कधी ते असे प्रश्न विचारत की, त्यांचे शिक्षकही कोड्यात पडत. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे काय? एखादया संख्येला शून्याने भागल्यावर काय होईल. हा भागाकार संपत नाही. अनंत असतो. रामानुजन याला लहानपणीच असे प्रश्न पडत. प्रतिभावान मुले आणि इतर मुले यातला मूलभूत फरक हा आहे की, त्यांना प्रश्नच पडत नाही. संध्याकाळी शाळा सुटल्यावर इतर मुले खेळत असत, तेव्हा ते पाटी व खडू घेऊन प्रश्न सोडवण्यात मग्न होत.
माध्यमिक शाळेत देखील गणिताच्या सर्व परीक्षांत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला व अनेक पारितोषिकेही मिळवली. त्यांच्या या यशामुळे त्यांचे शिक्षक प्रभावित झाले. रामानुजन यांच्या शेजारी महाविद्यालयात शिकणारा एक मुलगा राहत होता. एकदा रामानुजन यांनी त्याचे गणिताचे पाठ्यपुस्तक मागितले. त्या मुलाने रामानुजनना पुस्तक तर दिले; पण शाळेतल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या पुस्तकाची काय गरज, याचे त्याला नवल वाटले. रामानुजनने पुस्तकातील सर्व प्रश्न सोडवले, हे पाहून तर त्याला फारच आश्चर्य वाटले.
केवळ दोनच वर्षात त्यांनी प्राथमिक शालेय अभ्यासक्रम पूर्ण केला आणि वयाच्या दहाव्या वर्षी ते फायनलच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. रामानुजन यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी शालेय जीवनातच अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक पुस्तकांचे वाचन केले. त्यांची पाठांतर क्षमता आणि स्मरणशक्ती असामान्य होती. त्यांना संस्कृत सुभाषितमाला, पाढे आणि अनेक संख्यांचे वर्ग-घन-चतुर्थघात-वर्गमुळे-घनमुळे पाठ होती. शाळेत असतानाच रामानुजन यांनी एका कॉलेजच्या मित्रामार्फत कॉलेजच्या ग्रंथालयातील ‘कार’ नावाच्या जगप्रसिद्ध गणितज्ञाचे ‘सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट इन प्युअर अॅँड अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स’ हे पुस्तक मिळवले. गणितज्ञ शुब्रीज कार यांच्या पुस्तकात सुमारे सव्वासहा हजार सिद्धांत आहेत. ते सर्व सिद्धांत श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांनी कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय केवळ स्व-अध्ययनाने आत्मसात केले.
श्रीनिवास रामानुजन कॉलेजमध्ये जायला लागला तेव्हाची गोष्ट! त्याच्या एका गणिताच्या प्राध्यापकांचं नाव रामानुजचरिअर असं होतं. बीजगणित किंवा भूमिती शिकवताना त्यांना नेहमीच दोन फळ्यांचा वापर करत. तसंच ते गणित सोडवताना किमान १० तरी पायर्या वापरून गणित सोडवायचे. रामानुजनला इतका वेळ चाललेलं ते गणित पाहून इतका कंटाळा यायचा, की त्याचा संयम संपायचा आणि तो तीन किंवा चार पायर्या झाल्या की लगेचच आपल्या जागेवरून उठायचा आणि प्राध्यापकांच्या हातातला खडू घेऊन तेच गणित फळ्यावर जास्तीत जास्त चार पायर्यांमध्ये सोडवून दाखवायचा. त्या प्राध्यापकांसहित सगळा वर्ग चकित होऊन एकदा फळ्याकडे तर एकदा रामानुजनकडे बघत राहायचा.
नंतर मात्र वर्गाला आणि त्या प्राध्यापकांनाही रामानुजनच्या हस्तक्षेपाची इतकी सवय झाली होती की नवीन गणित शिकवताना, ते शिकवून झाल्यानंतर ते प्राध्यापक आधी रामानुजनकडे बघून ‘बरोबर आलंय ना रे गणिताचं उत्तर?’ असं म्हणून खात्री करून घेत असत. मग काय, विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांनाही रामानुजन फारच ग्रेट वाटायचा. पण काही विद्यार्थ्यांना मात्र रामानुजनचं गणित गोंधळात पाडायचं. याचं कारण रामानुजन गणित सोडवताना इतका अधीर व्हायचा की गणिताच्या मधल्या अनेक पायर्या तो मनातल्या मनातच सोडवून मोकळा व्हायचा आणि निवडक पायर्या फळ्यावर सोडवून दाखवायचा. त्यामुळे उत्तर बरोबर असलं तरी ते कसं आलं हे काही केल्या त्यांना कळत नसे.
रामानुजनना असणारी गणिताबद्दलची ओढ पाहून रामानुजनचे वडील चिंतित झाले होते. रामानुजनला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी २२ व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी जानकी यांचे वय नऊ वर्षांचे होते. रामानुजन यांनी जबाबदारी वाढल्याने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील रद्दी कागद तो वापरी. निळया शाईने लिहिलेल्या कागदावर लाल शाईने लिहून तो काटकसर करी. तो तामिळनाडूच्या विविध कार्यालयात जाई. तेथे तो प्रमाणपत्रे दाखवण्याऐवजी आपल्या फाटक्या वहीतील गणिती अंकांची करामत दाखवी. पण त्यामुळे त्याला कोणी थारा देत नसे. तरी शेवटी गणितच त्याच्या उपयोगी पडले. मद्रास पोर्ट ट्रस्टचे संचालक फ्रान्सिस स्प्रिंग हे त्याच्या तळपत्या गणिती बुद्धीने मुग्ध झाले आणि दरमहा २५ रु. वेतनावर कारकून म्हणून नेमले. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत थोडीफार सुधारणा झाली.
१७२९ = १७२८ (१२ चा घन) +१ ( १ चा घन).
क्षयाच्या आजाराने खंगून २६ एप्रिल, १९२० रोजी त्यांचे कुंभकोणम येथे अकाली निधन झाले. एक उज्ज्वल तारा क्षितिजावर अचानकच निखळला. केवळ ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास ४००० सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.