कष्ट आणि वेळेनुसार मिळालेले ज्ञानामुळे आपण योग्य आणि चुकीच्या गोष्टी समजू शकतो.
---------------------------------------------------------------------
बोधकथा
"एकेकाळी एक हिरे व्यापाऱ्याच्या मृत्यू प्रश्चात त्याच्या मुलावर कुटुंबाची जबाबदारी पडली होती. त्यांचा व्यापार बंद झाला होता. यामुळे त्यांनी आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासाळत होती. एके दिवशी मुलाला घरात एक हिऱ्याचा हार सापडला. त्याला हिऱ्याची अर्धवट माहिती होती, त्याला वाटले की, हा किमती हार आहे. तो हार घेऊन त्याच्या काकाकडे गेला. त्याचे काका देखील हिऱ्याचे व्यापारी होते. काकांनी हिऱ्याला पारखला आणि त्याला म्हणाले की, 'हा हार सध्या विकू नकोस. कारण सध्या व्यापारत मंदी आहे. कालांतराने विकशील तर त्या हारचे चांगले मूल्य मिळेल. तोपर्यंत तू माझ्या दुकानावर काम कर. यामुळे तुझ्या घराचा उदर्निवाह होईल.'
काकाने सांगितल्याप्रमाणे मुलाने त्यांच्या दुकानावर काम करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्याला हिऱ्यांची चांगली ओळख होत गेली. त्याला खरा आणि खोटा हिरा लगेच ओळखता येत होता. सोबतच त्याच्या घरची परिस्थिती सुद्धा रूळावर येत होती. जेव्हा त्याला बाजारात तेजी दिसली तेव्हा त्याने हिऱ्याचा हार विकण्याचा विचार केला.
मुलगा घरी गेला आणि हार काढून पाहिला असता तो हार खोटा असून त्याची काहीच मूल्य येणार नसल्याचे त्याला माहीत झाले. त्यानंतर तो तत्काळ आपल्या काकाकडे गेला.
काका त्याला म्हणाले, 'बाळा हा हार खोटा असल्याचे मला त्याच दिवशी समजले होते. पण मी जर तुला त्या दिवशी सांगितले असते तर तुझा माझ्यावर विश्वास बसला नसता. तू मला चुकीचे समजला असता. तुला वाटले असते की, मला हा हार बळकावयचा आहे. आज तू स्वतः हिऱ्यांना पारखू शकतोस. खरे आणि खोटे हिरे कोणते हे तुला माहीत आहे. यासाठी मी तुला माझ्याकडे कामाला ठेवले होते.'
कथेतील बोध
या गोष्टीतून शिकवण मिळते की, जेव्हा आपल्याला कमी किंवा अर्धवट ज्ञान असते तेव्हा आपण परिस्थितीला समजू शकत नाही. आपण दुसऱ्यांनाच चुकीचे समजतो.
अर्धवट ज्ञानामुळे आयुष्यात अडचणींमध्ये वाढ होते. कष्ट आणि वेळेनुसार मिळालेले ज्ञानामुळे आपण योग्य आणि चुकीच्या गोष्टी समजू शकतो.
1 टिप्पण्या
inspirational quotes👌👌👌👌👌khup chan ahe bodhkatha
उत्तर द्याहटवा