आता आले ट्रिपल सिम वाले फोन्स

0
141
views

सध्या तरी 2 सिम वाल्या फोनची चालती आहे. पण लवकरच हे चित्र बदलू शकते, त्या दिशेने पहिलं पाऊल टाकले आहे कूलपॅड या कंपनी ने. कूलपॅड हि एक चायनीज मोबाईल निर्माता कंपनी आहे. कूलपॅड ने काल खास भारतात दोन फोन मेगा3 आणि नोट 3 एस लॉन्च केले. हे दोनही फोन्स ट्रिपल सिमचे आहेत, मेगा3 हा फोन 6,999 आणि नोट3 एस हा 9,999 रु मध्ये, ऑनलाईन रिटेल स्टोर अमेझॉन वर 7 डिसेंबर पासून मिळतील.

मेगा 3 स्पेसिफीकेशन्स:-

 • मेगा3 स्मार्टफोन मध्ये 5.5 इंचाचा HD स्क्रीन असेल.
 • मेगा 3 मध्ये 8 मेगा पिक्सेल चा फ्रंट आणि मेगा पिक्सेल चा बॅक कॅमेरा आहे हा सेल्फी साठी बेस्ट फोन आहे.
 • यात 3,050 mAh क्षमतेची बॅटरी आहे.
 • यात कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 1.25 गिगाहर्डज क्षमतेचा प्रोसेसर आहे.
 • 2जीबी रॅम आणि 16जीबी इंटर्नल मेमरी आणि 64जीबी मेमरी कार्ड सपोर्ट
 • 2.5 डी कर्वेड डिस्प्ले ग्लास
 • गोरिला ग्लास प्रोटेक्टिशन

नोट 3s स्पेसिफीकेशन्स:-

 • या स्मार्टफोन मध्ये देखील 5.5 इंचाचा HD स्क्रीन असेल.
 • पण नोट 3s मध्ये चांगला बॅक कॅमेरा 13 मेगा पिक्सेल आहे पण फ्रंट फक्त 5 मेगापिक्सेलचाच आहे.
 • यात 2,500 mAh क्षमतेची बॅटरी आहे. जो 20% कमी आहे मेगा 3 पेक्षा.
 • यात कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 1.25 गिगाहर्डज क्षमतेचा प्रोसेसर आहे.
 • 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटर्नल मेमरी आणि 64जीबी मेमरी कार्ड सपोर्ट
 • 2.5 डी कर्वेड डिस्प्ले ग्लास
 • गोरिला ग्लास प्रोटेक्टिशन
Interesting
Loading...

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.