डॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग। dr APJ Abdul kalam’s awesome experience

0
3542
views

डॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग

डॉ.अब्दुल कलाम (APJ Abdul kalam) यांना पायलट बनायचे होते. पण त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली. नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की ,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील ‘एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग’ ला प्रवेश घ्यावा लागतो. मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले. ते त्यावर खुप रडले देखील.

परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले. नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली, त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले. त्याकाळी फक्त ‘एअर ईंडीया’ हीच पायलटच्या जागा भरायची व ‘एअर ईंडीया’ ला फक्त सात जागा भरायच्या होत्या आणि अर्ज आले होते आठ. त्यात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे टॉपर होते.

सर्वांची ईंटरव्यु घेण्यात आल्या आणि सीलेक्शन्स देखील झाले. पण डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली. डॉ. कलाम यांची “ऊंची” कमी आहे, या कारणामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारल होत.

डॉ.अब्दुल कलाम खुप हताश झाले, व ते रामकृष्ण मठात गेले जिथे त्याचं पूर्ण बालपण गेले होते. आपली निराशा आणि उदासी घेऊन ते हरीद्वारच्या मठात गेले. स्वामीजींनी कलामांना हताश पाहून त्यांना बोलले, ” का ऊदास आहेस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल. कलाम याना ते पटले व ते घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले.

पण दुस-या दिवशी पेपरमधे,”एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे” अशी जाहीरात आली होती, कुण्या विक्रम साराभाईंची. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट. ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट. एकच जागा. यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली.

कलाम दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, “सांगा विमान कुठे घेऊन जायचे?”.. यावर विक्रम साराभाई म्हणाले, “आपल्या जवळ विमानच नाहीये आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!”.

पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे.

तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !… कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल.

जीवनात अयशस्वी जरी झालोत तरी निराश होऊ नये
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!!

 

प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Die
असाच घेऊयात..!!

 

आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity

<

p style=”text-align: center;”>म्हणून नेहमी आशावादी राहुयात
आणि
जीवनात पुढेच चालत राहुयात;
👍👍👍👋👋👋

Interesting
Loading...

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.