काय जिओ मध्ये काळा पैसा लागला आहे? हे वाचा आणि जाणून घ्या

0
368
views

व्हाट्सऍप वर काही दिवसा पासून रीलायन्स जीओ (jio) बद्दल मेसेजस फिरत आहेत. कि अंबानीना नोट बंदी होणार हे  माहिती होते म्हणून त्यांनी जिओ काडून पैसा काळ्याचा पांढरा केला. तो मेसेज वाचून खूप लोकांना जिओ बद्दल खूप प्रश्न पडले असतील, हा लेख वाचून तुमचे त्या सगळ्या प्रशांना उत्तर मिळतील.

कंपनी म्हंटल तर सर्व गोष्टींचा हिशोब ठेवावाच लागतो. व हे सगळे हिशोब भारत सरकार ची संस्था सेबी(SEBI) ला द्यावेच लागतात. सेबी ही संस्था ग्राहक हितासाठी कंपनीन वर लक्ष ठेवून असते. जिओ मध्ये रिलायन्स ने तब्बल 1.5 लाख करोड ची इंवेस्टमेंट केली आहे. ती इन्वेस्टमेंट्स सेबी च्या देखरेखी खालीच झालेले आहेत, म्हणून यात काळ्या पैसाचे संबधच येत नाही.

रिलायन्स जिओ मध्ये किती पैसा लागला आणि तो आला कुठून?

5 वर्षा खाली रिलायन्स हि (zero debt)1 रुपया पण कर्ज नसलेली कंपनी होती, आणि कंपनी कडे 20 बिलियन डॉलर एवढे रिजर्व पैसे पडले होते. 20 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 1,40,000 करोड रुपये इतके होतात. हा पैसा रिलायंस नी ऑइल इंडस्ट्री मधून फायदा म्हणून मिळवला होता.

नंतर रिलायन्स ने इन्फोटेल ब्रॉडबँड नावाची कंपनी 2010 मध्ये 96% स्टॉक घेऊन खरेदी केली आणि आपले रिजर्व पैसे जो 1.5 लाख करोड रु यात लावले आणि इन्फोटेल चे नाव बदलून जिओ असे ठेवले. जिओ ने हा सर्व पैसा फायबर ऑप्टिकस च्या 2,70,000 किलो मीटर च्या वायरिंग साठी आणि 92,000 टॉवर उभारण्या साठि  खर्च केला.

reliance-jio-services1

जिओ सर्विस फ्री आणि अनलिमिटेड का देत आहे?

जर तुम्ही जिओ वापरल असाल तर तुम्हाला जाणवले असेल. जिओ ची इंटरनेट किंवा कॉलिंग ची सुविधा अगोदर पेक्षा खराब झालेली आहे. हे दर्शवते कि जिओ आपले ट्रायल घेत आहे. हि आणखी 100% कस्टमर रेडी सुविधा नाहीये. म्हणून जिओ याला सध्या फ्री मध्ये देत आहे. या बद्दल दुसया कंपनी नी आक्षेप पण घेतला आहे की जिओ ट्रायल चा व्यवसायिक फायदा घेत आहे आणि आता याची केस कोर्टमध्ये चालू आहे.

या फ्री आणि अनलिमिटेड ऑफर्स मुळे, जिओ ने 5 करोड ग्राहकांचा टप्पा फक्त 83 दिवसात मिळवला. तेच हे टप्पा गाठण्या साठी एअरटेल ला 12 तर व्होडाफोन ला 13 वर्ष लागले होते. इतक्या मीठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक परत मिळवण्यासाठी, जिओ ला जवळपास 10 ते 20 करोड ग्राहकची आवश्यकता आहे. म्हणून कंपनी ने न्यू ईयर ऑफर काढले आहे. ज्या द्वारे मार्च पर्यंत फ्री डेटा देऊन अधिक ग्राहकांना आपल्या कडे वळवता येईल.

आणखी एक म्हणजे रिलायन्स च स्वतः च फायबर ऑप्टिकस च जाळ असल्या मुळे त्याला ईतर कंपनी पेक्षा स्वस्त दरात नेट सुविधा पुरवता येतात. कॉलींग साठी जिओ इंटरनेटचाच वापर करतो जसे व्हाटसएप मध्ये करता येत अगदी तसच म्हणून व्हॉईस कॉल जिओ मध्ये पूर्णपणे फ्री आहे.

थोडक्यात रिलायन्स जिओ मुळे कंपनी आणि ग्राहक दोघांसाठी विन विन सिच्युवेशन तयार होते.

संदर्भ 

https://en.m.wikipedia.org/wiki/Jio

 

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.