जयललिता उर्फ अम्मा यांचा अभिनेत्री ते सीएम संपूर्ण प्रवास

0
560
views

अम्मा उर्फ जयललिता याना लहान पासून एक वकील बनायचं होत पण नियतीने त्यांना अगोदर एक अभिनेत्री मग नंतर एक राज्याची मुखमंत्री बनवले.  त्यांचा या दोन्ही क्षेत्रांमधला प्रवास काही सोप्पा नव्हता. जयललितांनी जवळपास 300 तमिळ फिल्मस मध्ये काम केलं आहे, आणि राजकारणात 8 वेळेस विधानसभा आणि 1 वेळेस राज्यसभा साठी निवडून अली, एवढंच नाही तर तब्बल 6 वेळा तमिळनाडू ची मुखमंत्री पण ते राहिल्या.

बालपण

24 फेब्रुवारी 1948 ला मैसूर जवळच्या मांड्या जिल्यातील मेलूरकोट या गावात अम्माचा जन्म झाला. त्या अवघ्या दोन वर्षाच्या होते तेंव्हाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि नेमकी इथून त्यांची संघर्षगाथा सुरु झाली.

जयललिता आई सोबत
जयललिता आई सोबत

त्यांची आई ‘वेदवली’ या तमिळ फिल्मस मध्ये काम करू लागल्या, या साठी त्यांनी स्वतः च नाव बदलून संध्या असे ठेवले. या काळात अम्मा त्यांचा मावशी आणि आजी आजोबा सोबत राहुन बँगलोर मधील बिशप शाळेत शिकत होती. पण मावशीच्या लग्ना नंतर अम्माला परत चैन्नई ला परतावे लागले.

जयललिता शालेय जीवनात
जयललिता शालेय जीवनात

 

अभिनेत्री

चेन्नई ला आल्या वर त्यांचा आयुष्याला एक नवीन वळण मिळणार होत. अभ्यासात चांगली गुणवत्ता दाखवून देखील त्यांचा आईंनी त्यांना जबरदस्ती सिनेमा मध्ये काम करायला भाग पाडले. अश्या प्रकारे ते इच्छा नसताना सिनेमा मध्ये आले.

जयललिता अभिनेत्री असताना
जयललिता अभिनेत्री असताना

अम्मानी अगोदर कन्नड सिनेमा मध्ये काम केलं होतं. मग काय त्या नंतर त्यांचा कडे एका मागून एक सिनेमा येतच गेल्या. त्यांनी त्या वेळच्या सगळ्या दिग्गज अश्या सिने कलाकारा सोबत काम केलं होतं जसेकी शिवाजी गणेशन, जयशंकर, राज कुमार, एन.टि.आर आणि एम.जी रामचंद्रन म्हणजेज एम.जी.आर सोबत.jayalalitha-actress-turned-politician

या व्यतिरिक्त त्यांनी त्या वेळच्या तेलगू सुपरस्टार अक्कीनेनी नागेश्वर राव सोबत 7 सिनेमा केल्या. शिवाजी गणेशन सोबत केलेले फिल्म ‘पट्टीकाडा पट्टीनामा’ साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पण मिळले होते.

jayalalitha

 

राजकीय प्रवास

एम जी रामचंद्रन हे राजकारणात आले आणि सोबत अम्मांना पण आणले. त्यांनी 1982 ला अन्नाद्रमुक ची सदस्यता घेतली आणि आपल्या चांगल्या इंग्लिश आणि भाषेवरच्या प्रभुत्वा मुळे ते पार्टी च्या प्रचार प्रमुख म्हणून निवडले गेले.

त्यांनी आपले पहिले सीट तिरुचेंदूर इथून लढवला आणी त्यात ते विजयी पण झाल्या. एम जी रामचंद्रन नी त्यांना1984 मध्ये राज्यसभेवर निवडून आणलं. अम्मा राजकारणातील आपले एक एक पायरी सर करत होती.

जयललिता एम् जे रामचंद्रन सोबत राजकारणात
जयललिता एम् जे रामचंद्रन सोबत राजकारणात

1988 मध्ये एम जी रामचंद्रन यांचा निधन झालं तेंव्हा त्यांचा उत्तर अधीकाऱ्यासाठी अन्ना द्रमुक हे दोन गटात विभागले गेले पहिला गट हा रामचंद्रन ची बायको जानकी रामचंद्रन यांच होत तर दुसरे अम्मांच. पण त्या वेळच्या विधानसभा अध्यक्ष पी एच पंडियन यांनी जयललिता गटाला अयोग्य घोषित करून जानकी रामचंद्रन याना मुखमंत्री बनवलं.

पण हे सरकार जास्ती चालले नाही आणी सरकार बरखास्त करून राज्यावर राष्ट्रपती शासन लावण्यात आले. या नंतर झालेल्या 1989 मधल्या निवडणुका मध्ये अम्माच्या 27 सीट आले आणि ते विरोधी पक्षाचे नेते झाल्या.

 

मुखमंत्री पद

जयललिता तरुण असताना
जयललिता तरुण असताना

25 मार्च 1989 ला तमिळ नाडु विधानसभेत द्रमुक आणि अन्ना द्रमुक या दोघांत जबरदस्त हातापाई झाली, यात जैललितांची साडी फाडण्यात आली. ती तश्याच फाटक्या साडीत बाहेर आली. या घटनेमुळे त्यांना लोकांनकडून जबरदस्त सहनभूती मिळाली. याच दिवशी जैललितांनी शपथ घेतली विधानसभेत आता मुखमंत्री बाणूनच जाईल अन्यथा नाही जाणार.

सन 1991 मध्ये राजीव गांधीची हत्या झाली त्या वेळी अम्मानी काँग्रेस सोबत हात मिळवणी करून 234 पैकी 225 सीट निवडून आणल्या, राजीव गांधी यांच्या हत्याची सहानभूती चा हा परिणाम होता. या वेळी अम्मा पहिल्यांदाच आणी राज्याच्या दुसऱ्या महिला मुखमंत्री बनल्या.

त्यांची पहिली कारकीर्द (१९९१-१९९६) त्यांच्या अहंकारी वर्तनामुळे गाजली होती. त्यावेळी त्यांच्या भ्रष्टाचाराचे आणि अहंमन्यतेचे किस्से खूप प्रचलित होते. त्यांनी सगळ्यांशीच पंगा घेतला होता. त्यावेळी १९९६ च्या निवडणुकीच्या वेळेस सुपरस्टार रजनीकांत यांनी एक विधान केले होते, “जयललिता पुन्हा सत्तेवर आल्या, तर ईश्वरही तमिळनाडूला वाचवू शकणार नाही.” त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांचा पराभव झाला.

दुसऱ्या कारकीर्दीत (२००१-२००६) त्यांचा भ्रष्टाचार कमी झाला, प्रशासन तर त्या उत्तम चालवितच. याच काळात २००४ साली आलेल्या त्सुनामीने होत्याचे नव्हते केले. मात्र अत्यंत कमी काळात अफाट कौशल्याने त्यांनी ते पुनर्वसन केले. आजवर त्या कामाबाबत एकही तक्रार नाही, हीच त्यांच्या कौशल्याची पावती होय. मात्र त्यांचा हेकेखोरपणा कायम राहिला. करुणानिधींना फरफटत नेण्याची घटना याच काळातील. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्यांना फटका बसला.

j-jailalita-2
निवडनुक विजया वेळी

मात्र तिसऱ्या कारकीर्दीत (२०११-१६) त्यांनी अधिक कल्याणकारी भूमिका घेतली. अम्मा उणवगम् (स्वस्तातील उपाहारगृहे), अम्मा तन्नीर (स्वस्तातील पाण्याच्या बाटल्या), अम्मा मरुत्तुवगम् (स्वस्तातील औषधी दुकान) अशा नाना योजना त्यांनी सुरू केल्या. त्यामुळे महिला मतदारांच्या मनात त्यांनी आपसूक घर केले आणि सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला.

 

मृत्यु

जयललिता अखेरचा क्षण
जयललिता अखेरचा क्षण

68 वर्षाच्या जयलालीतनी 6 डिसेंबर 2016 रोजी अपोलो रुग्णालयात आखेचा श्वास घेतला आणि खूपच महान असे महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.