कुंभाराचे गाढव-मोटिव्हेशनल स्टोरी

1
954
views

कुंभाराचे गाढव

दूर एका गावात एक कुंभार राहायचा कुंभार दररोज मडकी बनवत. ते मडकी तोच बाजारात घेऊन जात असे आणि विकत असे. त्याचा कडे एक गाढव होता, ज्याचा वर तो मडकी लादून घेऊन जात आणि येत असे.गाढव आता म्हातारा झाला होता आणि त्या मुळे खूप कमजोर पण झाला होता.

एक दिवस रणरणत्या ऊन्हात कुंभार आपली मडकी गाढवा वर लादून घेऊन जात होता. उन्हा मूळे दोघांचे चांगलेच हाल झाले होते. एवढयात अचानक गाढव अडखळून एका खड्यात जाऊन पडले.बिचारा गाढव कमजोर होता तरी त्याने आपली पूर्ण शक्ती लावून बाहेर येणाचा प्रयत्न केला पण खड्डा खोल असल्या मुळे त्याला यश येत नव्हते.

कुंभाराने पण त्याला काढायचे प्रयत्न केला पण त्याला पण ते जमत नव्हते.शेवटी त्याने विचार केला, की गाढव आता म्हातारे झाले आहे. त्याला कडून पण काही फायदा नाहीये.गाढवाला बाहेर काढण्या पेक्षा त्या खड्यातच त्याला पुरून टाकले तर बर होईल. एवढे विचार करून तो गावातल्या लोकांना आवाज देतो, आणि फावडा घेऊन येणास सांगतो.

सगळे लोक फावडा घेऊन येतात. आणि माती टाकायला सुरवात करतात. तिकडे गाढवाला काही काळातच नाही कि हे लोक काय करत आहेत? नंतर जेव्हा त्याला कळते तेंव्हा तो मोठं मोठाने ओरडायला सुरुवात करतो. पण लोक माती टाकतच राहिले.गाढव थोडा वेळ ओरडून शांत झाला, आवाज एन बंद झाले म्हणून लोकांनी माती टाकायचा वेग वाढवला.

थोड्या वेळानी लोकानी खड्यात बघितलं तेंव्हा गाढव खूपच विचित्र वागत होता. जर कोणी त्याचा पाठी वर माती टाकली तर तो पाठ हलवून माती खाली सरकवत आणि एक पाऊल वर घेई. हा प्रकार खूप वेळे चालत राहिला. आणि हळू हळू खड्डा भरून गेला आणि गाढव टुनकण उडी मारून खड्या बाहेर आला. लोक आश्चर्याने त्या गाडवाला बघतच राहिले.

मित्रांनो ही गोष्ट खूप काही सांगून जाते. आपण बऱ्याच वेळी समस्या रुपी खड्यात पडतो, परिस्थिती खूप विरुद्ध असते, कठीण असते. तरी ती परिस्थितीच त्या खड्या तुन बाहेर पडायला मदत करते फक्त आपण सकारात्म असायला हवे.

1 COMMENT

  1. आपण जेव्हा अडचणीत सापडत असतो. तेव्हा लोक आपला गैरफायदा घेतात.म्हनुन आपण खचुन न जाता खंबीर पणे उभे राहिले पाहिजे.

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.